Tarun Bharat

आंतरराष्ट्रीय विमानांचे पुन्हा लँडिंग?

 ब्रिटन, अमेरिकेसह अनेक देशांकडून आफ्रिकेतील उड्डाणांवर बंदी; प्रवाशांच्या अलगीकरणाचे नियमही कडक

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतात मार्च 2020 पासून बंद असलेली आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे 15 डिसेंबरपासून सुरु करण्याची घोषणा शुक्रवारीच करण्यात आली होती. सध्याच्या नियोजनानुसार धोका पातळीनुसार वेगवेगळय़ा देशांचे तीन गट तयार करण्यात आले आहेत. पण आफ्रिकन विषाणूच्या वाढत्या उदेकामुळे या फ्लाईट्सबंदीबाबत पुन्हा गांभीर्याने विचार केला जात आहे. काही राज्यांकडून तातडीने आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाच्या नवीन प्रकाराचा फटका बसलेल्या देशांच्या उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आपला देश मोठय़ा कष्टाने कोरोनापासून सावरला आहे. हा नवीन प्रकार भारतात येऊ नये यासाठी आपण शक्मय ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. दिल्ली आणि मुंबईमधून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे होत असल्याने महाराष्ट्रातूनही ही मागणी जोर धरू शकते.

दक्षिण आफ्रिकेत सापडलेला कोरोनाचा नवीन प्रकार जगात वेगाने पसरत आहे. हाँगकाँग आणि बोत्सवानानंतर इस्रायल आणि बेल्जियममध्येही नवीन प्रकाराची लागण झालेले लोक आढळले आहेत. यानंतर ब्रिटन, ऑस्ट्रिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि नेदरलँडने आफ्रिकन देशांतून येणाऱया विमानांवर बंदी घातली. आता अमेरिका, सौदी अरेबिया, श्रीलंका, ब्राझीलसह अनेक देशांनी आफ्रिकन देशांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. तसेच अन्य देशांमधून येणाऱया प्रवाशांच्या अलगीकरण नियमही बऱयाच देशांनी कडक केले आहेत.

Related Stories

जम्मू-काश्मीरमध्ये मेजरची आत्महत्या

datta jadhav

दिल्लीत 5,891 नवे कोरोना रुग्ण; 47 मृत्यू

Tousif Mujawar

पश्चिम बंगालमध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत 24.37 टक्के तर आसामध्ये 18.40 टक्के मतदान

Patil_p

काँग्रेस खासदाराकडून ‘अग्निपथ’चे गुणगान

Patil_p

अमरनाथ यात्रा 30 जूनपासून

Patil_p

सीएए नियमांची एप्रिलमध्ये घोषणा शक्य

tarunbharat