ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाचा प्रभाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑक्टोबर महिन्यात ही सेवा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र वाढता कोरोना प्रसार पाहता पुन्हा ही सेवा सुरु करण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे.
DGCA ने जारी केलेल्या परिपत्रकात याबाबत आदेश दिले आहेत. कोरोना महामारीमुळे देशात 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर बंधने येतातआणली आहेत.
16 जुलै रोजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत विमान वाहतुकीला परवानगी दिली होती. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कधी सुरु होणार याकडे मात्र लक्ष लागून आहे.