Tarun Bharat

आंतराष्ट्रीय आदिवासी दिन बोरीत साजरा

प्रतिनिधी / शिरोडा

 आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन नुकताच बोरी येथे साजरा करण्यात आला. येथील राघवेंद्र स्वामी सभागृहात अखिल भारतीय आदिवासी कामगार संघटना गोवा शाखेतर्फे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी समितीचे सल्लागार तथा माजी मंत्री रमेश तवडकर उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष उपासो गावकर व सरचिटणीस दीपक करमलकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्ज्वलीत करून मान्यवरांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दिवसभराच्या या कार्यक्रमात विविध सत्रे झाले. कोराना महामारी व आदिवासी जमातीची रोगप्रतिकार शक्ती या विषयावर चर्चासत्र झाले. त्यात डॉ. मधू घोडकिरेकर व अन्य प्रतिनिधींनी सहभाग घेतला. औपचारिक कार्यक्रमात बोलताना रमेश तवडकर म्हणाले, आदिवासी जमातीने भू, जल व संस्कृतीचे नेहमीच रक्षण केले आहे. आदिवासी ही आध्य जमात असून कमी शिक्षणामुळे ती मागे राहिली तरी त्यांना नैसर्गिक औषधी व वनस्पतींचे सखोल ज्ञान आहे. वनवासी असलेल्या या जमातीने समाज कल्याणाचे व्रत नेहमीच आचरणात आणले आहे. त्यांच्या उपयुक्त अशा औषधी ज्ञानाने समाजातील अन्य घटकांना नेहमीच फायदा झाला. आजही आदिवासी जमातीमधील अनेक बुजुर्ग व्यक्ती अशा वनौषधी देऊन समाजसेवा करीत आहेत.

औषधाचा हा पारंपारिक वारसा त्यांना निसर्गाकडूनच लाभला आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.  स्वागत अध्यक्ष उपासो गावकर यांनी केले. यावेळी आदिवासी समाजातील ज्येष्ठ नागरिक व वैद्य नारायण वेळीप व भिवा गावकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच युवा कार्यकर्ते केशव गावडे यांचाही शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश गावकर यांनी तर दीपक करमलकर यांनी आभार मानले.

Related Stories

‘गीत गुरुचरित्र’ कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

‘त्या’ दोन्ही मंत्र्यांना डच्चू द्यावा

Omkar B

केपेतील काँग्रेस उमेदवारीवर राऊल पेरेरा यांचा दावा

Amit Kulkarni

रोजगाराच्या संधी डावलल्याबद्दल आएसएल फुटबॉल सामन्यांना काँग्रेसचा आक्षेप, सामाने होऊ देणार नसल्याचा दिला ईशारा

Omkar B

सुसंस्कृत समाजासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज

Patil_p

फोंडा नगराध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Amit Kulkarni