Tarun Bharat

आंबा उत्पादकांसाठी फार्मा प्रोडय़ुसर कंपनी होणार स्थापन

देश-विदेशात चांगल्या भावाची हमी, फवणूकीपासून मिळणार संरक्षण

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरीमधील हापूस आंबा उत्पादकांना देश-विदेशात चांगला भाव मिळावा यासाठी फार्मा प्रोडय़ुसर कंपनीची स्थापना करण्यात येणार आह़े या कंपनीचा फायदा हा स्थानिक आंबा उत्पादकांना होणार आह़े तसेच क्यूआरकोड स्पॅनिंगमुळे हापूस आंब्याच्या नावाखाली होणारी ग्राहकांची फसवणुकीला देखील आळा बसणार आह़े त्यामुळे लवकरात लवकर फार्मा प्रोडय़ुसर कंपनी स्थापन करण्यात यावी, असा सूर आंबा उत्पादकांच्या बैठकीत मांडण्यात आल़ा

कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था यांच्यावतीने मंगळवारी हापूस आंबा उत्पादकांचा मेळावा घेण्यात आल़ा शहरालगतच्या टीआरपी येथील अंबर हॉल याठिकणी हा मेळवा झाल़ा यावेळी पणन मंडळाचे उपव्यवस्थापक भास्कर पाटील, सहाय्यक सरव्यवस्थापक मिलिंद जोशी, विवेक  भिडे, बावा साळवी, तसेच मुंबई येथील इनोटेरा टेक कंपनीचे अधिकारी उपस्थित होत़े यावेळी इनोटेरा कंपनीच्यावतीने फार्मा प्रोडय़ुसर कंपनीबाबत प्रेझेंटेशन सादर करण्यात आल़े

यावेळी भास्कर पाटील यांनी सांगितले की, फार्मा प्रोडय़ुसर कंपनी ही आता काळाची गरज आह़े या कंपनीच्या माध्यमातून आंबा उत्पादकांचा फायदाच होणार आह़े कोरोनाने आंबा उत्पादक शेतकऱयांना मार्केटींग शिकवले आह़े अन्यथा केवळ वाशी मार्केटमध्ये आंबा जात असल्याने त्यातून मिळेल तो भाव पदरात पडत होत़ा यातून काही वेळा नुकसान देखील आंबा उत्पादकांना होत होत़े मात्र या कंपनीच्या माध्यतातून देश-विदेशात आंबा विक्रीसाठी दारे खुली होणार आहेत़ त्याचप्रमाणे वाशी मार्केटवरील भार कमी झाल्याने त्याठिकाणी देखील आब्याला चांगला भाव मिळण्याची शक्यात आह़े

फार्मा प्रोडय़ुसर कंपनीमध्ये स्थानिक आंबा उत्पादक हे भागधारक असणार आह़े भागधारक म्हणून जीआय प्रमाणित शेतकरी समुदायाला सदस्य म्हणून कार्यरत केले जाईल़ तसेच केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने इन्फ्रास्ट्रक्चर निर्मीती व बॅंड विकास यासाठी सुर†िक्षत निधी उपलब्ध करण़े तसेच या कंपनीच्या माध्यमातून हापूस आंबा हा सूपर प्रिमियम फळ म्हणून समोर येईल व त्याचे मार्केटींग साठी प्रयत्न करण्यात येतील़ बाजारपेठांमध्ये धोरणात्मक नातेसंबध प्रस्थापित करणे आदी या कंपनीची उदीष्टे असणार आहेत़

आंबा उत्पादकांच्या बैठकीमध्ये आंबा उत्पादक शेतकऱयांनी विविध प्रश्न उपस्थित केल़े फळांवर येणारी फळमाशी, बुरशी आदींसाठी कोणती किटकनाशके वापरावीत यासंबधी देखील चर्चा करण्यात आल़ी आबा निर्यात करत असताना काही देशामध्ये विशिष्ट प्रकारची किटकनाशकांचा वापरावर बंदी घालण्यात आली आह़े वापरण्यास परवानगी मिळालेली किटकनाशके ही केवळ 8 ते 10 दिवस टिकतात़ यामुळे आंबा उत्पादकांसमोर मोठे संकट उभे राहिले आह़े अशी व्यथा आंबा उत्पादकांनी मांडल़ी तर सध्या बाजारात उपलब्ध असलेली किटकनाशके ही इतर पिंकाची आहेत़ त्यामुळे कोकणातील हवामानाचा विचार करून किटकनाशके तयार करण्यांसंबधी संशोधन करावे, अशी मागणी शेतकऱयांनी केल़ी

Related Stories

खांडज येथे गुदमरुन चौघांचा मृत्यू

Patil_p

उडतारेनजीक ट्रकने धडक दिल्याने बस क्लिनर जखमी

Archana Banage

वाई शहरात अज्ञाताने 10 गाड्या फोडल्या; परिसरात भीतीचे वातावरण

Archana Banage

सातारा : अनेवाडी, तासवडे टोल नाक्यावर जिल्ह्यातील वाहनांना टोल बंद करा

Archana Banage

पुढील आमदार राष्ट्रवादीचाच पाहिजे .!

Patil_p

सातारा : कायाकल्प पुरस्कारामध्ये रेठरेचा डंका

Archana Banage
error: Content is protected !!