Tarun Bharat

आंबेवाडी येथे साऊंड सिस्टीम जप्त

काकती पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी /बेळगाव

परवानगी न घेता लग्न समारंभासाठी साऊंड सिस्टीमचा वापर करणाऱयांविरुद्ध काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एक टेम्पो व साऊंड सिस्टीम जप्त केला आहे.

याप्रकरणी आंबेवाडी येथील कल्लाप्पा यल्लाप्पा कातकर व साऊंड सिस्टीमचा मालक रमेश मारुती पाटील (रा. भाग्यनगर) या दोघा जणांवर भा.दं.वि. 336 व मोटार वाहन कायदा 191, 192-ए कलम 37, 109, कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आंबेवाडी येथील कल्लाप्पा कातकर यांच्या घरी लग्न समारंभ होता. त्यासाठी साऊंड सिस्टीम लावण्यात आली होती. यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती. काकती पोलिसांना वरि÷ अधिकाऱयांमार्फत माहिती मिळताच पोलिसांनी 407 टेम्पोसह साऊंड सिस्टीम जप्त केली आहे.

Related Stories

भाग्यनगर येथे कचरा डंपिंगमुळे दुर्गंधी

Amit Kulkarni

विविध भागात उद्या वीजपुरवठा खंडित

Amit Kulkarni

जिल्हय़ात 8 हजार जणांनी घेतले पोस्ट विमा कवच

Amit Kulkarni

ठळकवाडी हायस्कूलमध्ये द.रा.बेंद्रे जयंती

Patil_p

श्री श्री रविशंकर गुरुजी 6 रोजी बेळगावात

Omkar B

कोरोनाग्रस्त व्यक्तींच्या नावांची यादी गुप्त ठेवा

Amit Kulkarni