Tarun Bharat

आईकडे जाता येत नसल्याच्या नैराश्यातून युवतीची आत्महत्या

प्रतिनिधी / कोल्हापूर

लॉकडाऊनमुळे सुट्टीत गावी आईकडे जात येत नसल्याच्या नैराश्यातून एका महाविद्यालयीन युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेरणा कुंतीनाथ कल्याणकर (वय 17, मुळ रा. अकोळ, ता. निपाणी, सध्या रा. तारा कॉलनी आर. के. नगर, पाचगांव, ता. करवीर) असे मृत युवतीचे नाव आहे. या घटनेने आर. के. नगर पाचगांव परिसरातील नागरिकांतून हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेची नोंद पोलिसांत झाली आहे.

घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मृत प्रेरणा कल्याणकर ही वडीलांचे छत्र हरपल्याने गेल्या दोन वर्षांपूर्वी आर. के. नगरमध्ये राहणार्‍या आजी-आजोबांकडे शिक्षणासाठी आली होती. ती शहरातील एका नामवंत महाविद्यालयात अकरावीमध्ये शिक्षण घेत होती. सुट्टीमध्ये तिला अकोळ गावी आईकडे जायचे होते. याच दरम्यान, कोरोना महामारीच्या संकटामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे तिला आजोळीच थांबावे लागले होते. आईच्या ओढीने तिने दोन वेळा कोगनोळी टोलनाक्यावरुन अकोळ गावी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्नाटक पोलिसांच्या अडवणुकीमुळे ती परत आपल्या आजोळी आली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नैराश्येच्या गर्तेत सापडली होती. या नैराश्येतून तिने शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याची नोंद करवीर पोलीसांत झाली आहे. 

Related Stories

केसीआर आणि प्रशांत किशोर यांची दुसऱ्या दिवशीही चर्चा सुरूच

Archana Banage

राजारामचे शेतकरी ज्ञानयागसाठी रवाना

Archana Banage

कोल्हापूर : कळंबा कारागृह अधीक्षकांवर कैद्याचा हल्ला

Archana Banage

इचलकरंजीतील कुख्यात बाबर गँगविरोधी मोकाअंतर्गत कारवाई

Abhijeet Khandekar

इचलकरंजीत रेशन धान्य दुकानदार आणि ग्राहकांत हाणामारी

Archana Banage

कोल्हापूर : मोफत शिवभोजनचा पावणे दोन लाख जणांना लाभ

Archana Banage