Tarun Bharat

आईचा गर्भाशय, स्मशान ही दोनच सुरक्षित स्थाने !

Advertisements

लैंगिक छळाला कंटाळून युवतीची आत्महत्या : चिठ्ठीत उल्लेख केला अत्याचाराचा पाढा  

चेन्नई / वृत्तसंस्था

महिलांसाठी या जगात आईचा गर्भाशय आणि स्मशानभूमी ही दोनच सुरक्षित स्थाने आता उरली आहेत, असे हृदयाला घरे पाडणारे शब्द आत्महत्या केलेल्या एका अल्पवयीन युवतीने आपल्या चिठ्ठीत लिहून ठेवले आहेत. 11 वीत शिकणाऱया या युवतीचा लैंगिक छळ तिच्या सरकारी शाळेत करण्यात येत होता. त्याला कंटाळून तिने शनिवारी आत्महत्या केली. या प्रकरणी तक्रार नोंद झाली आहे.

ही युवती नववीपर्यंत एका खासगी शाळेत शिकत होती. नंतर 11 वीच्या वर्गात ती आल्यानंतर तिला सरकारी शाळेत घालण्यात आले. खासगी शाळेत असताना तिला तिच्या शिक्षकाच्या मुलाकडून त्रास देण्यात येत होता, असा आरोप तिच्या वडिलांनी केला असून त्या दिशेनेही चौकशी केली जात आहे.

शाळा बदलल्यानंतरही तिचा लैंगिक छळ सुरुच राहिला होता असे सांगण्यात येते. त्यामुळे तिने महिलांसाठी आईचा गर्भाशय आणि स्मशानभूमी ही दोनच सुरक्षित स्थाने असल्याचे तिच्या आत्महत्या पत्रात लिहून ठेवले. तिच्या या पत्रावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्यात यावी आणि तिचा छळ करणाऱयांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला असून काही जणांची चौकशी केली आहे. तामिळनाडूत महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या प्रकारांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठी वाढ झाली असून महिलांचे सार्वजनिक जीवन अतिशय असुरक्षित बनले आहे, असा आरोप राज्यातील अनेक महिला संघटनांनी केला. काही दिवसांपूर्वी याच राज्याच्या कोईम्बतूर जिल्हय़ात एका युवतीचा झुडुपांमध्ये लपविलेला मृतदेह आढळून आला होता. ही युवती 11 डिसेंबरपासून गायब होती. तर याच जिल्हय़ातील एका युवतीने शिक्षकांकडून होत असलेल्या लैंगिक छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. दोन आठवडय़ांच्या काळात असे बरेच प्रकार घडले आहेत.

Related Stories

लष्कर-ए-मुस्तफा दहशतवादी संघटनेचा प्रमुख जेरबंद

Patil_p

बंगाल विधानसभेत जोरदार हाणामारी

Abhijeet Shinde

उत्तराखंड : दिवसभरात 398 नवे कोरोना रुग्ण; 10 मृत्यू

Rohan_P

नव्या कोरोना व्हेरिएंटबाबत पंतप्रधान मोदींनी घेतली तातडीची बैठक

Sumit Tambekar

भारतात 55,079 नवे कोरोना रुग्ण; एकूण रूग्णसंख्या 27 लाखांवर

datta jadhav

“ऑक्सिजनच्या संकटामुळे ७ दिवस झोपू शकलो नाही”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!