Tarun Bharat

आई अंबाबाईची दुसऱ्या दिवशी माहेश्वरी रूपात अलंकार पूजा

कोल्हापूर/प्रतिनिधी

आज अश्विन शुक्ल द्वितीया अर्थात ८ ऑक्टोबर २०२१ दिवशी करवीर निवासिनी आई अंबाबाईची माहेश्वरी रूपातली अलंकार पूजा साकारण्यात आली आहे. माहेश्वरी अर्थात शुंभनिशुंभ वधाच्या प्रसंगी रक्तबीज दैत्याचा संहार करण्यासाठी भगवतीच्या सहावी अर्थ प्रत्येक देवाची मूर्तीमंत शक्ती प्रगट झाली त्या शक्तींना मातृका म्हणून ओळखले जाते. या मातृका मंडलापैकी भगवान शंकरांची अर्थात महेश्वर यांची शक्ती म्हणजे माहेश्वरी.

भगवान शंकर हे सृष्टी क्रमामध्ये संहाराचे दैवत. संहार हा वाईट नसतो जे निर्माण होते ते कधी ना कधी नष्ट होते आणि जुने नष्ट झाल्याशिवाय नव्या निर्मितीला जागा उरत नाही. तेव्हा सृष्टी चक्रामध्ये जितके महत्त्वाचे स्थान निर्मितीला केव्हा पालनाला आहे तेवढेच महत्त्वाचे स्थान संहाराला आहे. भगवान शंकर कधी दैत्यांना वरदान देऊन देवांच्या दूर्गुणांचा संहार करतात तर कधी भक्तांना अभय देऊन त्यांच्या संसार चक्राचा शेवट करतात अशा या भगवान शंकरांची मूर्तिमंत शक्ती म्हणजे भगवती माहेश्वरी. हातामध्ये भगवान शंकरा प्रमाणेच त्रिशूल अक्षमाला अशी आयुधे, नंदी वाहन, माथ्यावरती चंद्रकोर जटामुकूट, कपाळावर त्रिनेत्र‌ अशी भगवती माहेश्वरी भक्तजनांच्या समस्त इच्छा पूर्ण करत त्यांच्या वासना वृत्तीचा संहार करते.

Related Stories

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकरांचा उमेदवारी अर्ज दाखल

Abhijeet Khandekar

शेतकरी,व्यापारी स्नेहभेटीची अठरा वर्षांची परंपरा कायम

Archana Banage

कोल्हापुरच्या अनुजची हॉलीवुडमध्ये `स्टार’ कामगिरी

Archana Banage

कुंभोज दानोळी रोडवर बिबट्याचे दर्शन कुंभोज नागरिकांत भीतीचे वातावरण

Archana Banage

परमबीर सिंहांच्या अडचणीत वाढ? सिंह यांचे निकटवर्तीय पुनुमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Archana Banage

मेरा भारत है महान…मेरी जान

Abhijeet Khandekar