Tarun Bharat

आई अंबाबाईला मानाचा शालू अर्पण

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

दुपारी साडेअकराच्या दरम्यान अंबाबाई मंदिराचा दक्षिण दरवाजा…पोलिसांनी तिथल्या परिसरातील गर्दी हटवली… तेवढÎात गोविंदा…गोविंदाचा जयघोष आवाज घुमू लागला…गोविंदाच्या जयघोषासोबतच मंत्रोच्चारही कानी पडू लागले…गुरुवारी rदक्षिण दरवाजातून तिरुपती देवस्थानकडून आई अंबाबाईला अर्पण करण्यासाठी शालू आणला होता.

तिरुमला तिरुपती देवस्थानचे डेप्युटी ईओ एम. रमेशबाबू, एम. कांचना, डी जनार्दना आणि पुजारी संपतकुमार यांचे मंदिर आवारात शालू घेऊन आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवडी यांनी स्वागत केले. त्यानंतर गोविंदा… गोविंदा, आई अंबाबाईचा एकसारख्या जयघोषाच्या गजरात शालू देवस्थापन समितीच्या कार्यालयात नेण्यात आला. तेथे शालूची नोंद करण्यात आली. एक लाख सात हजार 730 रुपये एवढÎा किंमतीचा हा शालू आहे. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास देवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवडी यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानकडून आई अंबाबाईला अर्पण करण्यासाठी आणलेला शालू एम. रमेशबाबू यांच्याहस्ते स्वीकारला. मंदिरातील पुजाऱयाकडून शालूचे पूजन केले. यावेळी आई अंबाबाईचा अखंड गजर, मंत्रोच्चार करण्यात आला. यावेळी सर्वांनी शालू घेऊन गाभाऱयाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण केली.

आम्ही भारतातील सर्व प्रमुख देवतांना शालू अर्पण करतो आहे. आई अंबाबाईला शालू अर्पण करण्यासाठी आलो याचा विशेष आनंद आहे, असे तिरुमला तिरुपती देवस्थानचे एम. रमेशबाबू म्हणाले.

Related Stories

इचलकरंजीत कापड गाठीने भरलेल्या ट्रकला आग; लाखोंचं नुकसान

Archana Banage

`मी बरा आहे..’ पण काहीही करून भावाला वाचवा.!

Archana Banage

पुणे मेट्रो मार्गातील अडथळे हायकोर्टाकडून दूर

Tousif Mujawar

कोल्हापूर : चौधरवाडी – म्हासूर्ली बंधाऱ्यावरुन वाहतूक बनली धोकादायक

Archana Banage

विवाहितेस त्रास दिल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल

Archana Banage

यंदाच्या पावसाळ्यात राहती घरे समुद्र गिळंकृत करण्याची भीती

Amit Kulkarni
error: Content is protected !!