Tarun Bharat

आई, मी युक्रेनमध्ये आहे, नागरिकांना लक्ष्य करत आहोत

Advertisements

रशियन सैनिकाचा स्वतःच्या आईला अखेरचा संदेश

‘आई, मी युक्रेनमध्ये आहे, येथे खरी लढाई होतेय. मी घाबरलो आहे. आम्ही सर्व शहरांवर एकाचवेळी बॉम्बवर्षाव करत आहोत. येथील नागरिकांनाही लक्ष्य करत आहोत’ असे एका रशियन सैनिकाने स्वतःच्या आईला पाठविलेल्या संदेशात म्हटले होते. या रशियन सैनिकाचा काही काळानंतर युद्धात मृत्यू झाला.

रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेच्या आपत्कालीन अधिवेशनात युक्रेनच्या राजदूताने हा संदेश वाचला आहे. युक्रेनमध्ये युद्ध लढण्यासाठी आलेल्या एका रशियन सैनिकाने स्वतःच्या आईला हा संदेश पाठविला होता असा दावा त्यांनी केला आहे.

संबंधित सैनिकाच्या आईने संदेशाला प्रतिसाद देण्यासाठी वेळ का लागतोय असे विचारले असता सैनिकाने आपण युक्रेनमध्ये असून स्वतःला फासावर लटकवू इच्छित असल्याचे म्हटले होते.

युक्रेनचे नागरिक आमचे स्वागत करतील असे आम्हाला सांगण्यात आले. परंतु युक्रेनचे नागरिक आमच्या चिलखती वाहनांसमोर आडवे उभे राहत आहेत. चाकांसमोर स्वतःला लोटून घेत असून आम्हाला पुढे जाण्यापासून रोखत आहेत. युक्रेनचे लोक आम्हाला फॅसिस्ट ठरवत आहेत असे या सैनिकाने स्वतःच्या संदेशात नमूद केले आहे. हा रशियन सैनिक युक्रेनसोबतच्या युद्धात सामील होण्यापूर्वी क्रीमियात तैनात होता.

Related Stories

भारत संयुक्त राष्ट्र परिषदेचा अस्थायी सदस्य; 184 देशांनी दिला पाठिंबा

Tousif Mujawar

दहशतवाद्यांना पोसतोय पाक!

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या दोन लाखांच्या उंबरठ्यावर

datta jadhav

ऑक्सफोर्डची लस आढाव्यासाठी तयार

Patil_p

कोरोनावर प्रभावी उपचार : ऍस्पिरिन

Patil_p

सरकारसोबतचा वाद संपविणार केयर्न एनर्जी

Patil_p
error: Content is protected !!