Tarun Bharat

आकर्षक मोटार क्रमांकासाठी आता 5 लाख मोजा!

वार्ताहर/ पाली

वाहनांसाठी पसंतीचा किंवा आकर्षक नोंदणी क्रमांक घेण्याकडे अनेकांचा ओढा असतो. पण आता हे क्रमांक महागणार आहेत. चारचाकीसाठी 10 हजारांपासून 5 लाखांपर्यंत, तर दुचाकीसाठी 5 हजारांपासून 1 लाखांपर्यंतची शुल्क आकारणी केली जाणार आहे. राज्याच्या गृहविभागाकडून या बाबतची अधिसूचना काढण्यात आली असून त्यावर नागरिकांच्या सूचना हरकती मागवण्यात आल्या आहेत.

  वाहनांची नवी मालिका जाहीर झाल्यापासून आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे मोठी मागणी येत असते. पूर्वी त्यासाठी कार्यालयात गर्दी होत असल्याने आता अर्ज मागवले जातात. एकाच क्रमांकासाठी अधिक मागणी असल्यास लिलाव करण्यात येतो. यातून कोटय़वधी रुपयांचा महसूल शासनाला मिळतो. शासनाने आकर्षक मोटार क्रमांकासाठी प्रस्तावित केलेली दर वाढ स्थगित करण्याची मागणी चालकातून होऊ लागली आहे.

Related Stories

लॉकडाऊनची होणार सक्त अंमलबजावणी

Patil_p

18 वर्षावरील वयोगटासाठी लसीकरण सत्र

NIKHIL_N

असनियेचे ग्रामदैवत माऊली वार्षिक जत्रोत्सव आज

Anuja Kudatarkar

आयकर भरणाऱयांकडूनही ‘पीएम किसान’चा लाभ

NIKHIL_N

कोरोना चाचणी न करताच ४२ जणांना मेसेज; चिपळुणातील गंभीर प्रकार

Archana Banage

Ratnagiri : कोकण रेल्वे मार्गावर रोहा येथे 18 रोजी ‘ब्लॉक’

Abhijeet Khandekar