Tarun Bharat

आकाशातून उंदरांवर पाडविले जाणार विष

Advertisements

फारलॉन बेटसमुहावर संशोधन करणारे वन्यजीव अधिकारी आणि तज्ञांनी उंदरांना मारण्यासाठी त्वरित आणि कठोर उपाययोजनांची गरज असल्याचे म्हटले आहे. उंदरांमुळे स्थानिक प्रजातींना धोका निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या फारलॉन बेटसमुहावर उंदरांना मारण्यासाठी हेलिकॉप्टरमधून विषाचा वर्षाव करण्यात येणार आहे. बेटावर प्लेग फैलावण्याचा धोका असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

 या योजनेचा प्रस्ताव युएस फिश अँड वाइल्डलाइफ सर्व्हिसने दिला होता.  स्थानिक पर्यावरण कार्यकर्त्यांच्या आक्षेपांनंतरही या योजनेला मंजुरी मिळाली आहे. आकाशातून विषाचा वर्षाव केल्याने उंदरांसोबत अन्य प्राणीही मरू शकतील अशी भीती पर्यावरण कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती.

एफडब्ल्यूएसच्या क्षेत्रीय संचालकाने देखील योजनेला मंजुरी दिल्यास सॅन फ्रान्सिस्कोच्या किनाऱयापासून काही अंतरावर असलेल्या बेटांवर 2023 पर्यंत हेलिकॉप्टरने विषाचा शिडकावा केला जाऊ शकतो असे वन्यजीव संस्थेने म्हटले आहे. सागरी पक्षी, रॅप्टर आणि अन्य प्राण्यांना कमीत कमी नुकसान पोहोचेल अशाप्रकारची कुठलीच योजना एफडब्ल्यूएसने तयार केली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. कीटकनाशकाचा वापर करण्यापूर्वी बेटांवरील काही प्राण्यांना हटविण्यासाठी लेझर, आतिषबाजी आणि अन्य तंत्रज्ञानांचा वापर करावा अशी सूचना त्यांनी केली आहे.

उंदरांच्या पूर्ण उर्न्मूलनासाठी कीटकनाशक ब्रोडीफाकॉमचा वापर करणे एकमात्र पद्धत असल्याचे योजनेच्या समर्थकांनी म्हटले आहे. याचा वापर नकळतपणे 19 व्या शतकात खलाशांनी या बेटावर केला होता.

कॅलिफोर्नियायच किनाऱयावर उडणारे उपाशी पक्षी या योजनेमुळे मृत्युमुखी पडू शकतात. कारण उंदरांवर कीटकनाशकाचा वापर झाल्यास ते मारले जातील आणि उपाशी पक्षी या मेलेल्या उंदरांना खाऊ लागल्यास त्यांच्या जीवाला धोका निर्माण होणार असल्याचे वेस्टर्न अलायन्स फॉर नेचरच्या सारा वान यांनी म्हटले आहे.

Related Stories

किल्ले राजगडावर शिवप्रेमींतर्फे पालखी सोहळा जल्लोषात साजरा

Rohan_P

दत्तनामाचा जयघोष आणि पुष्पवृष्टीने दत्तजन्म सोहळा संपन्न

Rohan_P

वसंत ऋतूच्या स्वागतासाठी गुगलचे खास डूडल!

Rohan_P

अंगारक संकष्टी : श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून ऑनलाईन दर्शनाची सोय

Rohan_P

अक्षयतृतीयेनिमित्त ‘दगडूशेठ गणपती’ला ११११ आंब्याचा नैवेद्य

Rohan_P

चिमुरडीने सापाचेच केले दोन तुकडे

Patil_p
error: Content is protected !!