Tarun Bharat

‘आकाश’ क्षेपणास्त्राच्या निर्यातीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

केंद्रीय मंत्रिमंडळाने देशाच्या संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘आकाश’ क्षेपणास्त्र प्रणालीच्या निर्यातीला  सरकारने परवानगी दिली आहे. डीआरडीओने विकसित केलेले हे क्षेपणास्त्र खरेदी करण्यात नऊ देशांनी रस दाखवला आहे. अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात ट्विट केले आहे.

‘आकाश’ क्षेपणास्त्र खरेदी करण्यात रस दाखवलेले हे देश दक्षिण-पूर्व आशिया आणि आफ्रिकेतील आहेत. मंत्रिमंडळाकडून परवानगी मिळाल्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील एक युनिट या देशांना ही शस्त्रप्रणाली निर्यात करण्याच्या संधींचा शोध घेईल.

मंत्रिमंडळाच्या परवानगीने निर्यातीला गती देण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, स्वावलंबी भारताच्या दृष्टीने देश संरक्षण उपकरणे आणि क्षेपणास्त्रांचे सर्वसमावेशक मसुदे तयार करण्याची क्षमता वाढवत आहे.

Related Stories

पुतण्याने लस घेतल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Abhijeet Shinde

धर्मनिरपेक्षतेचा अर्थ तुष्टीकरण नव्हे!

Patil_p

चरस विक्रीसाठी आलेला रेकॉर्डवरील नेपाळी गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

Abhijeet Shinde

खंडोबा तालमीचे माजी अध्यक्ष सुरेश जरग यांचे निधन

Sumit Tambekar

हरिद्वार : कुंभमेळ्यात लाखो भक्तांची गर्दी; कोरोनाच्या नियमांचे तीनतेरा

Rohan_P

नितीश कुमार सरकारमधील कॅबिनेट मंत्री विनोद कुमार सिंह यांचे निधन

Rohan_P
error: Content is protected !!