Tarun Bharat

आकाश चोप्राच्या आयपीएल संघाचे नेतृत्व धोनीकडे

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने निवडलेल्या सर्वकालीन सर्वोत्तम आयपीएल इलेव्हन संघाच्या नेतृत्वासाठी महेंद्रसिंग धोनीला पसंती दिली आहे. आयपीएल स्पर्धेत धोनी हा सर्वात यशस्वी कर्णधार असल्याचे त्याने म्हटले आहे.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात चेन्नई सुपर किग्ज संघाला आपल्या नेतृत्वाखाली धोनीने तीनवेळा अजिंक्यपद मिळवून दिले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किग्जने आयपीएल स्पर्धेत विक्रमी सातवेळा अंतिम फेरी गाठली, असे आकाश चोप्राने यु टय़ूबच्या ‘आकाशवाणी’ या चॅनेलवर ही माहिती दिली आहे. आकाश चोप्राच्या सर्वकालीन आयपीएल संघामध्ये रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर यांना सलामीच्या जोडीसाठी पसंती दिली आहे. फलंदाजीच्या क्रमवारीत कोहली तिसऱया स्थानावर, सुरेश रैना चौथ्या, दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलीयर्स पाचव्या तर धोनी सहाव्या स्थानावर आहे. त्यानंतर फिरकी गोलंदाज म्हणून हरभजनसिंग आणि सुनील नरेन यांची तर भुवनेश्वरकुमार, लसिथ मलिंगा, बुमराह यांना वेगवान गोलंदाज म्हणून त्याने निवडले आहे. गौतम गंभीर आणि आंद्रे रस्सेल यांना 12 वा व 13 वा खेळाडू म्हणून निवडले आहे. कोरोना महामारी संकटामुळे गेल्या मार्च महिन्यापासून जागतिक स्तरावरील सर्व क्रीडास्पर्धा थांबल्या आहेत. आयपीएल स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली आहे, असेही चोप्राने म्हटले आहे.

आकाश चोप्राने निवडलेला सर्वोत्तम आयपीएल संघ- डेव्हिड वॉर्नर, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, डिव्हीलीयर्स, धोनी, हरभजन सिंग, सुनील नरेन, भुवनेश्वर कुमार, मलिंगा, बुमराह. राखीव खेळाडू-गौतम गंभीर आणि आंद्रे रस्सेल.

Related Stories

थॉमस जेतेपद इतिहासजमा, राष्ट्रकुल सुवर्ण हे पुढील टार्गेट

Patil_p

शेफाली वर्मा मानांकनात दुसऱया स्थानी

Patil_p

शेवटच्या कसोटीतून डी. ब्रुयेन बाहेर

Patil_p

टय़ुनिशियाच्या अहमदला ‘सरप्राईज गोल्ड’

Patil_p

सुर्यकुमार यादवचं वादळी शतक, टीम इंडियाच्या १९१ धावा

Archana Banage

सर्बिया, स्पेन उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p