Tarun Bharat

आखाडा येथील शाळा जपण्याची गरज

सांतइस्तेव्ह पंचायतीचे आखाडय़ाचे पंचसदस्य सुरेंद्र वळवईकर यांचे उद्गार

प्रतिनिधी /कुंभारजुवे

आखडा हे बेट असुनही या इथे अगदी सतवीपर्यंत शिक्षणाची सोय होती त्यामुळे पन्नास वर्षापूर्वीपासून लोकांना शिक्षण मिळाले. त्यामुळे इथला शिक्षणाचा स्तर वाढावा व ती शाळा जपणे हे प्रत्यकांचे परम कर्तव्य आहे. मात्र काही पालक ते न करता आपल्या पाल्यांना शिक्षणांसाठी परगावी पाठवित असल्याने. या शाळेच्या विद्यार्थ्यांची गणती कमी होते. ही शाळा जपण्यासाठी मी झाल्या परीने काही सुविधा देणार आहे. त्या शाळेत  मी एक वाचनालय करणार आहे त्याचा उपयोग ज्ञानवृद्धीसाठी होईल असे उद्गार सांतइस्तेव्ह पंचायतीचे आखाडय़ाचे पंचसदस्य सुरेद्र वळवईकर यांनी काढले.

आराखडा येथील सरकारी प्राथमिक शाळेत स्वतंत्रता दिनादिवशी माशेल येथील माशेल अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीतर्फे शिक्षण योजनेतर्फे, शाळेला कपाट व गोष्टीची पुस्तके प्रदान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक पंचसदस्य सुरेंद्र वळवईकर शाळेच्या सभागृहात बोलत होते.

या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख वक्ते सेवानिवृत्त शिक्षक अशोक तिळवी, माशेल अर्बन कॉ. क्रेडिट सोसायटीचे चेअरमन ऍड. विनायक नार्वेकर, वाईस चेअरमन प्रकाश नाईक, संचालक रामानंद तारी मुख्याध्यपिका अपर्णा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांचे श्लोक सावंत, संजीवनी फडते, वैष्णवी सावंत मल्हार वळवईकर, प्रमेश वळवईकर, परिज्ञा फडते, चैतन्य फडते, अंश सावंत, स्वंयम फडते यांनी मान्यवर व अन्य उपस्थित संचालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

प्रमुख पाहुणे पंचसदस्य सुरेद्र वळवईकर यांनी फित कापून कपाट शाळेला प्रदान केले. कपाटाची चावी संचालक रामानंद तारी यांच्या हस्ते मुख्याध्यापिका अपर्णा भोसले यांच्याकडे सुपूर्द केल्या. वाईसचेअमन प्रकाश नाईक यांच्या हस्ते पुस्तक संच मुख्याध्यापिका अपर्णा भोसले यांच्याकडे देण्यात आला.

शाळेच्या शिक्षणांबरोबर विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणे तेवढेच गरजेचे आहे यासाठी चांगल्या विचारांची पुस्तकांचे वाचन मुलांकडून व्हायला पाहिजे मुलांना महागडी खेळणी देण्यापेक्षा, चांगली पुस्तके आणुन द्यावीत व पालकांनी ती वाचली जातील याची दक्षता घ्यावी. विचारांचे धन शिक्षणाबरोबर असेल म्हणजे त्या मुलांना भविष्ष्यात आपले जीवन घडविण्यात उपयोगी पडते असे प्रतिपादन सेवा निवृत्त जेष्ठ शिक्षक अशोक तिळवी यांनी केले. या बेटावरची ही शाळा सुंदर आहे शिवाय  निर्सगाच्या सानिध्यात असल्याने मुलांना चांगल्या वातावरणाबाबत शिक्षण मिळेल. कारण निर्सग व शिक्षण यांचा जवळचा संबंध आहे. पालकांनी अशी शाळा टिकवून ठेवण्यासाठी आपल्या मुलांना दुरवर शिक्षणांसाठी न पाठविता जवळच्या ssशाळेत मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाणार आहे. असे गौरवोद्गार चेअरमन ऍड. विनायक नार्वेकर यांनी काढाले. याप्रसंगी श्लोक सावंत, संजीवनी सावंत, मल्हार वळवईकर, प्रमोद वळवईक, चैतन्य फडते, अंश सावंत, स्वयम फडते, वैष्णवी सावंत, परिझा फडते यांनी स्वात्र्यदिनानिमित्त भाषणे केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वैशाली हळर्णकर, स्वागत अपर्णा भोसले व आभार सालवीना गोम्स यांनी मानले या प्रसंगी संतीश नाईक अर्जुन नाईक, भानुदास गावकर, पुष्पा आमोणकर, हेमंत नाईक हे संचालक व पालक उपस्थित होते.

Related Stories

मुख्यमंत्र्यांना खर्च कपातीचा सल्ला द्यावा

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांनी हाऊसिंग बोर्डची जागा परत करावी

Amit Kulkarni

मुख्यमंत्री बदलण्याचा विचार नाही- सदानंद तानावडे

Patil_p

तार नदीवरील पूल 30 मे पर्यंत खुला

Amit Kulkarni

सरकारच्या भूमी अधिकारीणी विधेयकाला सत्तरी तालुक्मयातून विरोध करणारच.

Amit Kulkarni

प्रतापराव हवालदार यांचे निधन

Amit Kulkarni