Tarun Bharat

आगामी चित्रपटात सुबोध भावे पहिल्यांदाच साकारणार हटके भूमिका

ऑनलाइन टीम /नवी मुंबई

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे नेहमीच हटके भूमिका साकारून प्रेक्षकांना भुरळ पाडत असतो. त्याची नवी भूमिका पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. आज सुबोधने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे . ‘फुलराणी’ हा त्याचा आगामी चित्रपट येत असून यात विक्रम राजाध्यक्ष ही मुख्य भूमिका तो साकारणार आहे.

या पोस्टरवर अभिनेता सुबोध भावेसोबत पाठमोरी ‘फुलराणी’ पाहायला मिळत आहे.हे पोस्टर शेअर करताना, ‘फुलराणी’ या माझ्या नवीन चित्रपटामध्ये आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका साकारण्याचा एक प्रयत्न करतोय. तुमचे सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद असू द्या!’तसेच ‘कोरोनाचे सर्व नियम पाळून चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याचे खूप समाधान आहे. 2022 मध्ये आधी चित्रपटगृहांत आणि मग बाकी माध्यमांतून ‘फुलराणी’ प्रदर्शित करायचा मानस निर्मात्यांनी आणि फुलराणीच्या सर्व टीमने केला आहे.फुलराणीचे पहिले motion poster खास तुमच्यासाठी.’ असं सुबोध ने लिहले आहे .

या चित्रपटाचे लेखक- दिग्दर्शक विश्वास जोशी असून हर्षवर्धन साबळे, जाई जोशी, अमृता राव हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
पण फुलराणीची भूमिका कोण साकारणार? आणि इतर कलाकार कोण आहेत? हे अजून समजलेलं नाही. हि पोस्ट शेअर केल्यानंतर अनेक मराठी कलाकार आणि सुबोधच्या चाहत्यांनी त्याच अभिनंदन केलं आहे तसेच त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Related Stories

हे त्रिकूट म्हणणार ‘सोपं नसतं काही’

Patil_p

अनिल परबांच्या कारवाईवर संजय राऊतांचा इशारा

Archana Banage

सोलापूर : शहरात ४८ तर ग्रामीणमध्ये ३१ पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage

कोट्यवधींची संपत्ती असणारे दरेकर मजूर कसे?

datta jadhav

कोल्हापूर : जिल्हा परिषद उपाध्यक्षांना कोरोनाची लागण, 31 नवे पॉझिटिव्ह

Archana Banage

कोयना अवजल प्रकल्प ठरणार रिफायनरीची पूर्वतयारी?

Amit Kulkarni