Tarun Bharat

आगामी निवडणुकांची आतापासूनच तयारी

7 जुलै रोजी निजद नेत्यांची बैठक : उमेदवार निवडीबाबत होणार चर्चा

प्रतिनिधी /बेंगळूर

कोरोना रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणात घट होत असल्याने राज्य सरकारने सोमवारपासून अनलॉक 3.0 ची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर निजदने आगामी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. पक्षातील विविध समितींची पुनर्रचना करण्याचा पुढाकार वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. आगामी बेंगळूर महापालिका, जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकांची तयारी आतापासून सुरू केली आहे.

आगामी निवडणुकांबाबत चर्चा करून पुढील रुपरेषा आखण्यासाठी पक्षातील ज्ये÷ नेते, कार्यकर्त्यांची 7 जुलै रोजी बेंगळुरातील जेपी भवनात बैठक बोलविण्यात आली आहे. सदर बैठक दुपारी होणार असून बैठकीत बेंगळूर महापालिका, जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती निजद प्रदेशाध्यक्ष एच. के. कुमारस्वामी यांनी दिली आहे. यावेळी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

बैठकीत पक्षसंघटना, उमेदवारांची निवड यासह विविध विषयांवर चर्चा करून त्यादृष्टीने निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच पक्षातील विविध समितींची पुनर्रचना करण्यात येणार असून तालुका घटकांच्या नूतन रचनेबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

Related Stories

सोमवारी उडुपीमध्ये शाळा, पीयू महाविद्यालये बंदच राहणार

Archana Banage

म्हैसूर: चार नवीन नगरपंचायती, नगरपरिषदा स्थापण्यास परवानगी

Archana Banage

स्फोटाचे दृष्य चित्रित करताना अभिनेता रिषभ शेट्टी जखमी

Amit Kulkarni

कर्नाटकात कोरोनाने ५८८ रुग्णांचा मृत्यू

Archana Banage

परिवहन कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर; चौथ्या दिवशीही संप सुरूच

Archana Banage

सेक्स सीडी प्रकरण : माझ्याकडे धक्कादायक पुरावे आहेत : रमेश जारकिहोळी

Archana Banage