Tarun Bharat

आगामी हातकणंगले लोकसभा निवडणुकीत राहुल आवाडे भाजपचे उमेदवार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे आश्वासन

इचलकरंजी / प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार हे राहुल प्रकाश आवाडे असतील अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी शुक्रवारी इचलकरंजी येथे दली. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाणा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडीक, माजी आमदार अमल महाडीक आदी उपस्थित होते. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने शुक्रवारी त्यांनी ताराराणी पक्षाच्या नगरसेवकांची भेट येथील ताराराणी पक्ष कार्यालयात घेतली. त्यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी वरील उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज श्री पाटील यांनी आमदार आवाडे व त्यांच्या समर्थकांची भेट घेतली. ताराराणी पक्ष कार्यालय या ठिकाणी आयोजित या भेटीवेळी आवाडे यांना मानणारे तसेच त्यांच्या गटातील जिल्हा परिषद सदस्य, इचलकरंजी हुपरी व हातकणंगले येथील नगरसेवक उपस्थित होते. त्यांच्यासोबत माजी आमदार अमल महाडिक, प्रा.जयंत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पाटील यांनी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे हेही उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात उमेदवार कोण याबाबतचा याबाबतची उत्सुकता आज संपली आहे. राहुल आवाडे यांनी यापूर्वी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या निमित्ताने मोर्चेबांधणी केली होती. मात्र पक्ष कार्यालयाकडून आलेल्या सूचनेनंतर त्यांनी आपली माघार घेतली होती. आता भाजपच्या वतीने राहुल आवाडे यांची घोषणा करून त्यांना कामास लागावे असा स्पष्ट संकेत चंद्रकांत दादा पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आत्तापासूनच वेगवेगळी राजकीय समीकरणे तयार होण्यास सुरुवात झाली आहे.

Related Stories

शासन आदेशानुसार शैक्षणिक फीमध्ये 15 टक्के सवलत द्या

Archana Banage

टाटा मोटर्सने जिल्हा परिषद शाळेचे रूपडे पालटले

Archana Banage

शहापूर येथे अज्ञात युवकाचा निघृण खून

Archana Banage

कोल्हापूर : उपवडे येथील अल्पवयीन मुलीची आत्महत्या, युवकास तीन दिवसाची पोलीस कोठडी

Archana Banage

आता कसं वाटतंय? गार गार वाटतंय.. संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांचा संजय राऊतांना सणसणीत टोला

Rahul Gadkar

भाजपकडून अमल महाडिक यांना उमेदवारी

Abhijeet Khandekar