Tarun Bharat

आगीमुळे बुडाली इराणची ‘खर्ग’ युद्धनौका

ऑनलाईन टीम / तेहरान :  

ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ तैनात असलेली इराणची सर्वात मोठी युद्धनौका आग लागून बुडाली. रात्री सव्वादोनच्या सुमारास या जहाजाला आग लागली होती. अग्निशमन दलाने आग विझविण्याचे 20 तास अथक प्रयत्न केले. मात्र, ही युद्धनौका बुडाली. सुदैवाने या नौकेवरील सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.  

‘खर्ग’ असे या बुडालेल्या युद्धनौकेचे नाव असून, ती मुख्य तेल टर्मिनसच्या रुपात इराणसाठी काम करत होती. मोठ्या प्रमाणात युद्धसामग्री या जहाजातून घेऊन जाता येत होती. ही नौका एका टेनिंग मिशनवर गेली असता रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्याला आग लागली. अग्निशमन दलाकडून 20 तास आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, तरीही हे जहाज जस्क बंदराजवळ बुडाले.

Related Stories

चीनमध्ये लसींच्या चाचणीस प्रारंभ

Patil_p

युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांना चर्चिल पुरस्कार

Patil_p

युद्धाची झळ देशांना बसू लागली, गहू महागला

Patil_p

बांगलादेशींना मज्जाव

Patil_p

पंजशीरमधील तालिबानच्या चौक्यांवर एअर स्ट्राईक

datta jadhav

नेपाळमधून उड्डाण केलेलं विमान बेपत्ता, विमानात 4 भारतीय प्रवाशी

datta jadhav