Tarun Bharat

आग्रा – लखनऊ एक्सप्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात 5 जण ठार

Advertisements

ऑनलाईन टीम / फिरोजबाद : 


उत्तर प्रदेशातील फिरोजबाद जिल्ह्यात शनिवारी पहाटे ट्रक आणि कार यांच्यामध्ये अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली असून तिला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा – लखनऊ एक्सप्रेस वे वर शनिवारी पहाटे हा अपघात झाला. फिरोजबाद रस्त्यावरील नसीरपुर भागातील हायवे वर एक ट्रक उभा होता. आग्र्याहून लखनऊला जाणारी एक कार उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. ही धडक एवढी जोरात होती की, यात कारचा चक्काचूर झाला.


यामध्ये कार मधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी महिलेला रुग्णालयात पाठवलेे आहेे.


मृतांची ओळख पटली असून त्याची नावे रविनेश पांड्ये, त्यांची पत्नी रुबी पांडये, लक्ष्य पांड्ये, केशव पांड्ये आणि नंदिनी पांड्ये अशी आहेत. तर प्रियांका पांड्ये या जखमी झाल्या आहेत. प्रियांका यांना दिल्लीतील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. हे सर्वजण दिल्लीतून प्रयागराज येथे जात असताना हा अपघात झाला. दरम्यान, पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. 

Related Stories

श्रीनगर चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Abhijeet Shinde

आदित्य ठाकरे महिनाअखेरीस कोल्हापूर दौऱ्यावर

Abhijeet Shinde

या प्रेमाला म्हणावे तरी काय ?

Patil_p

दोन महिन्यांनी परतले घरी

Patil_p

जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले? हे तर पळकुटे मंत्री… : चित्रा वाघ

Rohan_P

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा- धनंजय मुंडे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!