Tarun Bharat

आग्रा : सणासुदीच्याआधी वाढला कोरोना संसर्गाचा वेग; रुग्णसंख्या 1800 पार

ऑनलाईन टीम / आग्रा : 


आग्र्यात सणासुदीच्या आधी अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. शुक्रवारी 39 नवे कोरोना रुग्ण वाढल्याने कोरोना ग्रस्तांचा एकूण आकडा 1804 वर पोहोचला आहे. मागील 48 तासात 74 नव्या रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

 
डीएम प्रभू एन सिंह यांनी सांगितले की, जिल्ह्यात आतापर्यंत 99 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत 262 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शुक्रवारी 2,056 टेस्ट करण्यात आल्या. तर 20 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत 1,443 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Related Stories

स्वपन दासगुप्ता, महेश जेठमलानी राज्यसभेवर नियुक्त

Amit Kulkarni

भाजप-तृणमूलसाठी पुढील तीन टप्पे निर्णायक

Patil_p

महाडिक भ्याले, राजारामच्या उमेदवार अपात्रतेवरून सतेज पाटलांचा हल्लाबोल

Archana Banage

मध्यपूर्वेतील तणाव : भारत महत्वाचा

Patil_p

९२ नगरपरिषदांच्या ओबीसी आरक्षणावर आज सुनावणी

Archana Banage

पैलवान पृथ्वीराज पाटीलने कुस्तीपंढरी कोल्हापूरची उंचावली शान

Archana Banage
error: Content is protected !!