Tarun Bharat

आग्वाद तुरुंग नूतनीकरण उद्घाटनास पंतप्रधान येणार

प्रतिनिधी /म्हापसा

26 कोटी रुपये खर्चून नूतनीकरण केलेल्या आग्वाद कारागृह संकुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते केले जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. हे कारागृह पर्यटनदृष्टय़ा विकसित केले जाईल.

गेल्या दिल्ली भेटीवेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना यासाठी निमंत्रितही केले आहे आणि मोदींनी गोव्यात येण्याची तयारीही दाखविली आहे. उद्घाटनाची तारीख नंतर जाहीर केली जाईल. पर्यटनमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी आग्वादला भेट दिली. कारागृहाच्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोव्याचा इतिहास प्रतिबिंबित होईल. दरम्यान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुरामध्ये ज्यांची घरे कोसळून किंवा सामान वाहून गेल्याने व पडझडीमुळे जी हानी झाली त्यांना येत्या 15 ऑगस्टपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल असे स्पष्ट केले.

Related Stories

राणे द्वयीने सत्तरीतील लोकांना लाचार बनविले

Amit Kulkarni

पेडणे सार्वजनिक गणेशोत्सवाचे सुवर्णमहोत्सवात पदार्पण साधेपणाने व सरकारी नियम पाळून 11 दिवस साजरा होणार

Omkar B

पर्यटनाची बदलती व्याख्या गोव्यासाठी चिंताजनक

Amit Kulkarni

नाणूस नदीत तीन भावंडे बुडाली

Amit Kulkarni

आमदार डिकॉस्तांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

Amit Kulkarni

उपनिरीक्ष नारायण पिंगे यांना निलंबीत करा

Amit Kulkarni