Tarun Bharat

आजपासून पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी महागले

राज्य सरकारचा निर्णय

प्रतिनिधी/मुंबई

राज्य सरकारकडून पेट्रोल-डिझेलचे दर लिटरमागे दोन रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. लॉकडाऊन काळात राज्याच्या तिजोरीवर पडलेला भार हलका करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. 1 जूनपासून शहरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 78.31 रुपये तर डिझेल दर प्रतिलिटर 68.21 रुपये होत आहे. तो पूर्वी पेट्रोलचा 76.31 पैसे व डिझेलचा 66.21 रुपये दर होता.

राज्य सरकारने डिझेलवर पूर्वी 1 रुपया सेस (उपकर) आकारला होता तो 3 रुपये केला आहे. तर पेट्रोलवर 10 रुपये 12 पैसे सेस केला आहे. पूर्वी तो 8 रुपये 12 पैसे इतका होता. यामुळे पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी महागले आहे. या नव्या दरानुसार राज्याच्या तिजोरीत साधारण दहा महिन्यांत 3 हजार कोटींची अतिरिक्त भर पडेल. असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

कोरोना संसर्ग नियंत्रण तसेच स्थलांतरितांच्या पुनर्वापसीवरुन राज्याच्या तिजोरीवर ताण आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निर्णय घेतला आहे. कोरोना महासंकटात देशभर 24 मार्चपासून लॉकडाऊन सुरु आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात शिथिलता आणली आहे. त्यातून दैनंदिन व्यवहार सुरळित होत आहे.  लॉकडाऊन काळात पेट्रोल-डिझेल विक्री 50 टक्केहून कमी झाली आहे. त्यात आता दरवाढीमुळे कर्नाटकसारख्या राज्याहून महाराष्ट्राचे दर अधिक होणार आहे. यामुळे राज्यांतर्गत वाहतूक सुरळित झाल्यानंतर याचा फटका बसेल असे चित्र आहे.

Related Stories

माझ्याभोवती माता-भगिनींचं सुरक्षा कवच : नरेंद्र मोदी

prashant_c

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी शशी थरूर यांना नोटीस

Amit Kulkarni

कैद्यांना शिक्षेत विशेष सूट देण्याचा विचार

Patil_p

पायलटच्या चुकीमुळे बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश

Archana Banage

दिल्ली मनपासाठी 50 टक्क्यांवर मतदान

Patil_p

द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित

Patil_p