प्रतिनिधी / आजरा
आजरा तहसीलदार कार्यालयात कार्यालयात लिपिक आज अॅन्टीजेन कोरोना चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. सर्व तहसील इमारत व परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे.
संबंधित लिपिक गडहिंग्लज मधील दवाखान्यात किरकोळ उपचार घेऊन आल्याचे कळते. आज सकाळी येथे कार्यरत असताना त्रास होऊ लागल्याने तातडीने आजरा कोविडमध्ये चाचणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते गडहिंग्लज वरून ये – जा करतात. दोन – तीन दिवसांपूर्वी आणखी तिघे त्यांच्यासह येथे एका वाहनातून आल्याने व एकत्र असल्याने त्या तिघांचेही चाचणी करण्यात आली. सुदैवाने ते सर्व निगेटिव्ह आल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र आजरा तहसिलमधील इतरांचे स्वॅब घेतले गेले असून त्यांचे अहवाल आता प्रतिक्षेत असल्याचे सांगण्यात आले. या नंतरची खरबरदारी म्हणुन संबंधित लिपिकाच्याची पत्नी व मुले यांचीही तपासणी करण्यात येणार आहे.


previous post