Tarun Bharat

आजर्‍यात दोन गावठी पिस्तुलसह दहा लाखाचा मुद्देमाल जप्त

दोघांविरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद

Advertisements

आजरा/प्रतिनिधी

बहिरेवाडी ता. आजरा येथे दि. ३० रोजी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी गडहिंग्लज यांच्या आदेशानुसार आजरा पोलीस स्टेशनचे स पो. नि. हारुगडे आणि पोलीस ठाणे स्टाफ असे गांजा विरोधी पथकामध्ये कारवाई करीता भागामध्ये गस्त करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानुसार दोन इसम हे सोलापूर येथून गावठी बनावटी पिस्टल व २९ राऊंडसह आजरा पोलीस ठाणे हद्दीतून जात असताना बहिरेवाडी येथे ताब्यात घेतले असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात आली आहे.

गावठी पिस्तूलसह सुमारे 10 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सद्दाम रशीद शेख, शहानवाज अल्लाउद्दीन शेख (रा. विरवडे बुद्रुक, ता. मोहोळ, जिल्हा सोलापूर) या दोघांविरोधात या प्रकरणी आजरा पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास आजरा पोलीस ठाणे करीत आहे.कोल्हापूरच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी ग्रामिण भागात गस्त वाढविण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकडेही पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे.

Related Stories

वडिलांना विचारून आलायं का ?

Abhijeet Shinde

Kolhapur Rain Update : कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग बंद, राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले

Abhijeet Khandekar

शिवछत्रपती पुरस्काराची नियमावली संकेतस्थळांवर

Abhijeet Shinde

`युनिफाईड बायलॉज’चे घोडे अडले कुठे?’

Abhijeet Shinde

कोल्हापूर : यंदाही पाळणार बंधन, लहान मूर्तीलाच वंदन

Abhijeet Shinde

कलिंगडला भाव 60 ते 70 रुपये.. व्यापाऱ्यांकडून मागणी मात्र पंधरा वीस रुपयाला

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!