Tarun Bharat

आजही आपण कोरोनाच्या चक्रव्युहातच : डॉ. अविनाश भोंडवे

ऑनलाईन टीम / पुणे :

कोरोनाने सगळ्या जगाला वेठीस धरले असून यातून बाहेर पडण्यासाठीचा खात्रीशीर मार्ग अजून ही सापडलेला नाही. कदाचित 2020 या वर्षाच्या शेवटी आपली यामधून सुटका होईल, अशी आशा वाटते आहे. मात्र, आजही आपण कोरोनाच्या चक्रव्युहातच आहोत, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले. 


येथील दिलीपराज प्रकाशनातर्फे प्रकाशित डॉ. अविनाश भोंडवे लिखित ‘कोरोनाचा चक्रव्यूह’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन आज दिलीपराज प्रकाशन आणि आडकर फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते, त्यावेळी डॉ. भोंडवे बोलत होते. 


डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले की, कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेला देखील त्याचे निदान होऊ शकले नाहीत. विषाणूजन्य निमोनिया असे त्याला म्हटले गेले आणि पाहता पाहता त्याने सगळ्या जगाला आपल्या विळख्यात घेतले. हा संसर्गजन्य आजार संपूर्ण जगासाठी महामारी ठरेल, असा विचार देखील कोणी केला नव्हता. आम्ही वैद्यकीय अभ्यास करताना सार्ससारख्या आजारांनी देखील ठाण मांडले होते, मात्र त्याचे स्वरूप कोरोनाइतके व्यापक नव्हते. आज या संदर्भात सगळ्या पातळ्यांवर योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

भारतीयांमध्ये आरोग्य साक्षरतेचे प्रमाण कमी असून त्यात समाजमाध्यमांवरील अफवांमुळे सगळ्यांवरील ताण वाढतो आहे. अशा परिस्थितीत सगळ्यांना विश्वासार्ह माहिती मिळण्यासाठी आणि त्याआधारे सकारात्मक वातावरण तयार होण्यास हातभार लावण्यासाठी मी हे लेखन केले आहे. याव्दारे निदान अफवा आणि अंधश्रद्धांची साखळी तोडता येईल, असे वाटते. 

Related Stories

फडणवीसांचा दावा धादांत खोटा…उपमुख्यमंत्र्यांना खोटे बोलणे शोभत नाही- अजित पवार

Abhijeet Khandekar

दहावी-बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाईनच

Archana Banage

रुपाली चाकणकरांनी गृहमंत्र्यांकडे केली देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याची मागणी

Archana Banage

महाराष्ट्र : मागील 24 तासात 11,060 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

Mumbai Politics : सरवणकरांच्या कार्यालयावर दगडफेक करत बॅनर्स फाडले

Archana Banage

मुंबईच्या माजी महापौरांना अटक,सोमय्या हल्ला प्रकरणात कारवाई

Archana Banage