Tarun Bharat

आजाराचा बाजार करण्याचे भाजपचे धोरण आजही चालुच : अमरनाथ पणजीकर

प्रतिनिधी / पणजी

कोविड आजाराचा उपचार डिडीएसवायच्या खाली आणण्याचा सरकारी निर्णय आज भाजप सरकारने रद्द केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या मध्ये कमिशनचा वाटा ठरविताना एकमत न झाल्यानेच हा निर्णय सरकारने घेतला आहे. आजाराचा बाजार करण्याचे भाजपचे धोरण आजही सरकारने चालुच ठेवले असुन, परमेश्वराने लोकांना चांगले आरोग्य द्यावे व कोविड आजारापासुन दूर ठेवावे अशी आम्ही प्रार्थना करतो असे काँग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.

  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यासह मंत्रीमडळातील सर्व मंत्री व भाजपचे पदाधिकारी कोविड महामारी काळात केवळ सरकारी तिजोरी लुटण्यात व्यस्त आहेत हा काँग्रेस पक्षाचा आरोप आजच्या निर्णयाने परत एकदा खरा ठरला आहे. भाजप सरकारला लोकांच्या आरोग्याचे काहीच पडलेले नाही हे स्पष्ट झाले आहे.

  कोविड महामारीचे गोव्यात रुग्ण सापडल्यानंतर चाचणी केंद्र सुरू करणे, वैद्यकीय उपकरणे व व्हेंटीलेटर खरेदी या सर्वांसाठी मागील सात महिन्यात जो विलंब झाला तो मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांच्या कमिशन वाटून घेण्यात एकमत नसल्यामुळेच  हे आम्ही परत एकदा सांगतो असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे. आजच्या निर्णयांने का??ग्रेसचा दावा खरा ठरला आहे.

Related Stories

गोव्याच्या भवितव्याचा आज फैसला

Amit Kulkarni

मागील निवडणुकीत काँग्रेसचा घात केलेल्या पक्षांशी युती नको : सार्दिन

Amit Kulkarni

रिवणमध्ये भाजपाची विजयी परंपरा कायम

Patil_p

रमेश तवडकर यांची भाजप राष्ट्रीय अनुसूचित जनजाती मोर्चावर निवड

Amit Kulkarni

भंडारी समाजाच्या आमंत्रणावरून केजरीवाल हरवळे रुदेश्वर मंदिरात

Amit Kulkarni

मनोज परब यांचा सांखळी पलिकेवर मोर्चा नेण्याचा इशारा

Amit Kulkarni