Tarun Bharat

आजारास कंटाळून पती, पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

गारगोटी / प्रतिनिधी

आकुर्डे ता. भुदरगड येथील पती, पत्नीने आजारास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. सदाशिव बाळू भांदिगरे (वय 62) सुरेखा सदाशिव भांदिगरे (वय 57) अशी त्यांची नाव आहेत. या घटनेची नोंद भुदरगड पोलीसांत झाली आहे.

तालुक्यातील आकुर्डे इथले सदाशिव भांदिगरे व त्यांची पत्नी सुरेखा हे दोघेही सतत आजारी असल्याने त्यांच्यावर औषधोपचार सुरु होते. आज दुपारी घरात कोणी नसल्याचे पाहून 12.30 वाजण्याच्या सुमारास घराला लागून असलेल्या जनावारांच्या गोठ्यात लोखंडी पाइपला दोरी लावून पती, पत्नीने गळफास घेतला.

सकाळपासून दोघांचीही चाहुल न लागल्यामुळे शोधाशोध केली असता भांदिगरे पती, पत्नीचा मृतदेह गोठ्यात लोंबकळत असल्याचे निदर्शनास आले. त्याची वर्दी सदाशिव यांचा भाऊ निवृत्ती भांदिगरे यांनी पोलीसांत दिली. भांदिगरे दांम्पत्यास दोन विवाहित मुले आहेत. गारगोटी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पती, पत्नीच्या आत्महत्येचे वृत्त आकुर्डे गावात समजताच नागरीकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

Related Stories

कसबे डिग्रज पूरग्रस्त मदतीच्या गैरकारभाराची चौकशी ?

Archana Banage

नियमांचा अतिरेक करणाऱ्या पोलिसांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

Archana Banage

चंदगड तालुक्यातील बुझवडेत घराची भिंत कोसळली, तिघे जखमी

Archana Banage

ऋषीकेशचा खून अनैतिक संबंध की आर्थिक वादातून, मैत्रिणीची चौकशी सुरु

Archana Banage

पोलिसांनी करुन दाखविले

Kalyani Amanagi

कारचा वेग कमी करण्यासाठी दाबला ब्रेक, खिडकीतून बाहेर पडून चिमुकलीचा जागीच मृत्यू

Archana Banage