राष्ट्रपतींना पत्र
वृत्तसंस्था / पाटणा
राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या कन्येने वडिलांसाठी नवा पुढाकार घेला आहे. तिने राष्ट्रपतींना पत्र लिहून लालूंच्या मुक्ततेची मागणी केली आहे. याचबराब्sरा मुक्ततेच्या मुद्दय़ाला आंदोलनाचे स्वरुप देण्याचे प्रयत्नही सुरू केले आहेत.
लालूंची कन्या रोहिणी आचार्यने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे राजद अध्यक्षांची मुक्तता करण्याची मागणी केली आहे. गरीबांचे देवता आदरणीय लालूप्रसाद यादव यांच्यासाठी राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. या मोहिमेत सामील होऊन स्वतःच्या नेत्याच्या मुक्ततेचे आवाहन करण्यात यावे. ज्यांनी आम्हाला शक्ती दिली, आज त्याची शक्ती होण्याची वेळ असल्याचे रोहिणींनी ट्विटरद्वारे समर्थकांना उद्देशून मटले आहे.


लालूंच्या चाहत्यांनी पाटण्यातील राजदच्या कार्यालयात पोहोचून लालूंच्या मुक्ततेसाठी आवाहन करावे असे रोहिणींनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. रोहिणींचा हा ट्विट लालूंचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांनीही रीट्विट केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी
राजद अध्यक्ष लालूप्रसादांची प्रकृती खालावल्यावर आता त्यांच्या मुक्ततेची राजकीय मागणी उपस्थित होऊ लागली आहे. बिहार काँग्रेसचे अध्यक्ष मदन मोहन झा यांनी लालूंच्या आरोग्यासंबंधी चिंता व्यक्त केली आहे. लालूंवर तुरुंगात राहण्याचा दबाव असल्याने त्यांची प्रकृती बिघडत चालली आहे. लालूंची जीवन वाचविण्यासाठी त्यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात यावी असे झा म्हणाले.