Tarun Bharat

आज कंकणाकृती सूर्यग्रहण

ऑनलाईन टीम / मुंबई : 

आज वर्षातील पहिले कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. या ग्रहणात सूर्याचा 99 टक्के भाग झाकला जाणार आहे. त्यामुळे देशात काही ठिकाणी दिवसाच अंधार पडणार आहे. 5.48 तास हे ग्रहण असणार आहे. 

जागतिक पातळीवर हे ग्रहण सकाळी 9 वाजून 15 मिनिटांपासून सुरू झाले असून, 3 वाजून 3 मिनिटांनी ते संपेल. दुपारी 12 ते 12.30 दरम्यान या ग्रहणाची तीव्रता अधिक असेल. भारतात अनेक ठिकाणी लोकांना सूर्यग्रहणाचे दर्शन होणार आहे. यावेळी अद्भुत असे  रिंग ऑफ फायर लोकं पाहू शकतील. देशातील काही भागात हे सूर्यग्रहण खंडग्रास पद्धतीने दिसणार आहे. 

या ग्रहणाचा परिणाम केवळ भारतावरच नव्हे तर चीन, अमेरिकेसह जगातील अनेक देशांवरही होणार आहे. 26 डिसेंबर 2019 च्या ग्रहणानंतर पसरलेल्या कोरोना साथीच्या रोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी हे ग्रहण महत्वाचे मानले जात आहे. चंद्रग्रहणाप्रमाणेच सूर्यग्रहण देखील उघड्या डोळ्यांनी पाहू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Related Stories

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड साजिद मीरला अटक

datta jadhav

‘राज ठाकरे चूहा है’ म्हणणारे बृजभूषण सिंह पुण्यात येणार, मनसे विरोध करणार?

datta jadhav

पुण्यासारख्या ठिकाणी लॉकडाऊन करा ; मुंबई हायकोर्टाची मुख्यमंत्र्यांना सूचना

Archana Banage

९२ नगरपरिषदांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार? सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

Archana Banage

शरद पवारांच्या भेटीसाठी प्रशांत किशोर ‘सिल्व्हर ओक’वर दाखल

Archana Banage

जातीय आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार : गृहमंत्री

Archana Banage
error: Content is protected !!