Tarun Bharat

आज दहावी परीक्षेचा गणितचा पेपर

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोनाच्या संकट काळातही सुरू असणाऱया दहावी परीक्षेचा दुसरा पेपर शनिवारी होणार आहे. अधिकतर विद्यार्थ्यांना नेहमीच कठीण वाटणारा गणित विषयाचा पेपर शनिवारी होणार आहे. यंदाची दहावीची परीक्षा गुरुवारपासून सुरू झाली असून, विविध नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांना पहिला पेपर द्यावा लागला. शनिवारी  गणितचा पेपर होणार आहे. तर परीक्षार्थी विद्यार्थ्यांना नियमांचे पालन करतच पेपर द्यावा लागणार आहे. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना सकाळी 8.30 पर्यंत दाखल व्हावे लागणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार असून, सॅनिटायझरचा आणि मास्कचा वापर करावा लागणार आहे. गुरुवारी पहिला पेपर सुरळीतपणे पार पडल्याने विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्येही यंदाच्या परीक्षा पद्धतीची जाणीव झाली आहे.

सकाळी 10.30 पासून पेपरला सुरुवात होणार असून, दुपारी 1.45 पर्यंत वेळ आहे. गणित विषयासाठी 15 मिनिटे जादाचा कालावधी देण्यात आला आहे. मात्र बदललेल्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपामुळे विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे. तर सुमारे तीन महिने अभ्यासापासून विद्यार्थी काहिसा दूर झाला आहे. शिक्षक वर्गांकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने सर्व विषयांचे वर्ग भरविण्यात आले आहेत. मात्र गणित विषयासाठी रोजच्या रोज सराव महत्त्वाचा असून, गणित प्रात्यक्षिक स्वरुपात सोडविल्यासच विद्यार्थ्यांना हा विषय सोपा वाटतो. मात्र यावषी कोविड-19 परिस्थितीमुळे हे शक्मय झाले नसल्याने विद्यार्थ्यांना गणित विषय जड जाण्याची शक्मयता आहे. उपाययोजनात्मक प्रश्नही विचारले जाणार असल्याने विद्यार्थ्यांना हा विषय आव्हानात्मक ठरणार आहे.

बेळगाव शैक्षणिक विभागातील 124 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरू असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने शिक्षण खात्याने सर्व ती खबरदारी घेतली आहे. गुरुवारी पहिल्या पेपर वेळीही संपूर्ण जिल्हय़ात आवश्यक उपाय योजना करण्यात आल्या होत्या. यामुळे कोरोनाच्या संकटकाळात दहावीची परीक्षा निर्विघ्नपणे पार पडेल का, या प्रश्नाला सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे. शनिवारी होणाऱया पेपरवेळीही विद्यार्थ्यांची पूर्णपणे काळजी घेण्यात येणार असल्याचे शिक्षण खात्याच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे. तसेच परीक्षा केंद्रावर आपल्या पाल्यांना घेऊन येणाऱया पालकवर्गांनी केंद्रासमोर विनाकारण गर्दी करून नियमांचे उल्लंघन करू नये. सामाजिक अंतराचे भान राखावे. आपल्यासह मुलांच्याही आरोग्याच्यादृष्टीने पालक वर्गाने नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

विद्युत बिलासाठी कॅन्टोन्मेंटला एसएफसी अनुदान मंजूर

Amit Kulkarni

गोकर्णनजीक तदडी बंदरात सापडला 500 किलोचा व्हेल शार्क मासा

Amit Kulkarni

गोकुळ सेंद्रीय उत्पादने विक्रीस उपलब्ध

Patil_p

भू-माफिया एजंटांची पिरनवाडीमध्ये दहशत

Amit Kulkarni

कडधान्य; डाळींच्या किमतीत भरमसाट वाढ

Patil_p

समितीचे नेते वाय. बी. चौगुले यांना नवहिंदतर्फे श्रद्धांजली

Patil_p
error: Content is protected !!