Tarun Bharat

आज पाच गाळय़ांसाठी होणार मनपात लिलाव

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

खंजरगल्ली येथील गाळय़ासह धारवाडरोड, महात्माफुले रोड, महांतेशनगर अशा विविध ठिकाणाचे गाळे भाडेतत्वावर देण्यासाठी शुक्रवार दि. 8 रोजी लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. मात्र खंजरगल्ली गाळय़ांचा लिलाव करण्यास न्यायालयाची स्थगिती असल्याने गाळय़ांचा लिलाव होणार नाही. मात्र अन्य पाच गाळय़ांसाठी लिलाव होणार आहे.

महानगरपालिका कार्यालयात शुक्रवारी नगरविकासमंत्री बसवराज बी. ए. यांची आढावा बैठक होणार आहे. तसेच लिलाव प्रक्रिया देखील राबविण्यात येणार आहे. जुना धारवाडरोड येथील व्यापारी गाळय़ातील पहिल्या मजल्यावरील हॉल भाडेतत्वावर देण्यात येणार आहे. याकरिता 10 लाख रूपये अनामत रक्कम आणि 30 हजार रूपये भाडे निश्चित करण्यात आले. तसेच महात्मा फुले भाजी मार्केटमधील गाळा क्रमांक 24 भाडेतत्वावर देण्यासाठी लिलाव होणार आहे. याकरिता 1 लाख रूपये अनामत रक्कम आणि 5 हजार रूपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. तसेच मागील लिलाव प्रक्रियेवेळी महांतेश नगर भाजी मार्केटमधील गाळय़ाला बोली लागली नव्हती. त्यामुळे यावेळी पुन्हा लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याकरिता 50 हजार रूपये अनामत रक्कम आणि 1 हजार रूपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी सकाळी 11 ते 1 या दरम्यान अनामत रक्कम भरणे बंधनकारक आहे.

Related Stories

हेस्कॉमच्या संजीव हम्मण्णावर यांचा सत्कार

Amit Kulkarni

लक्षणे नसलेल्या रुग्णांवर होणार स्वतंत्र उपचार

Patil_p

बसुर्ते येथे पावसामुळे घर कोसळल्याने कुटुंब झाले बेघर

Amit Kulkarni

वॉर्डस्तरीय ‘कोविड-19’ टास्कफोर्स स्थापण्याची सूचना

Amit Kulkarni

महालक्ष्मी यात्रेसाठी हिंडलगा सज्ज

Amit Kulkarni

मराठा संस्कृती संवर्धन संघटनेच्यावतीने रक्तदान शिबिर

Patil_p
error: Content is protected !!