Tarun Bharat

आज पुन्हा पेट्रोल – डिझेलच्या दरात वाढ; मुंबईत पेट्रोल 103.89 रुपये

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डीझेलच्या किमतींमध्ये दर वाढ केल्याचे पाहायला मिळाले आहे. आज पेट्रोलमध्ये 26 पैसे आणि डिझेलमध्ये 7 पैश्यांची वाढ झाली आहे. 4 मे पासून आतापर्यंत पेट्रोल 7.44 रुपये तर डिझेल 7.52 रुपये प्रति लिटर महाग झाले आहे. तर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलने शंभरी ओलांडली आहे. 

  • 8 राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 +

देशातील 8 राज्यात म्हणजेच राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, जम्मू काश्मीर, लडाख आणि महाराष्ट्रात पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. महानगरात मुंबई, हैदराबाद आणि बंगळूरमध्ये   पेट्रोल प्रति लिटर 100 रूपयांपेक्षा अधिक आहे.


आज मुंबईत पेट्रोल 103.89 रुपये, डिझेल 95.79 रुपये प्रति लिटर, दिल्लीत पेट्रोल 97.76 रुपये तर डिझेल 88.30 रुपये इतके झाले आहे. चेन्नई पेट्रोल 98.88 रुपये तर डिझेल 92.89 इतके आहे. आणि कोलकातामध्ये पेट्रोल 97.63 रुपये तर डिझेल 91.15 रुपये इतके वाढले आहे. 

  • श्रीगंगानगरमध्ये डिझेल 101 रुपये 


राजस्थान मधील श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 108.94 रुपये तर डिझेलसाठी 101.48 रुपये प्रति लिटर मोजावे लागत आहेत. मध्य प्रदेशातील अनूप शहरात एक लिटर पेट्रोल 108.56 रुपये मिळत आहे. तर डिझेल 99.39 रुपये प्रति लिटर इतके आहे. तर महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोल 104.98 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 95.39 रुपये प्रति लिटर आहे. भोपाळमध्ये पेट्रोल 105.99 रुपये आणि डिझेल 97 रुपये प्रति लिटर इतके आहे. जयपूरमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी 104.44 रुपये तर डिझेलसाठी 97.35 रुपये मोजावे लागत आहेत.

  • दररोज 6 वाजता किमती बदलतात


दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

Related Stories

नव्या सुधारणांना होतो विरोध

Patil_p

जिग्नेश मेवाणी यांना तीन महिन्यांची शिक्षा

Amit Kulkarni

जगातून दहशतवाद उखडून टाकू !

Amit Kulkarni

नव्या बाधितांचा आकडा 20 हजारांपेक्षा कमी

Patil_p

तेल गेले…..हाती धुपाटणे आले

Patil_p

इंदौर : एअर होस्टेसने विकले अडीच कोटींचे ड्रग्ज

datta jadhav
error: Content is protected !!