Tarun Bharat

आज रात्री बारापासून वीज कर्मचारी 72 तासाच्या संपावर

खासगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचारी आक्रमक, 18 जानेवारीपासून बेमुदत संप

वार्ताहर/ कराड

विद्युत क्षेत्रातील खासगीकरणाविरोधात राज्यभर निवेदने व आंदोलने करूनही राज्य सरकारने निर्णय न घेतल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समितीने आंदालनाची धार अधिक तीव्र केली आहे. त्यानुसार आज मंगळवारी रात्री बारा वाजल्याच्या नंतर सर्व वीज कर्मचारी व अधिकारी 72 तासाच्या संपावर जाणार आहेत. तरीही शासनाने निर्णय न घेतल्यास 18 जानेवारी पासून बेमुदत संप करण्यात येणार आहे.

   ठाणे व नवी मुंबईसारख्या लाभाच्या क्षेत्रात समांतर वीज परवाना मिळावा म्हणून अदानी कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाकडे मागणी केली आहे. अदानी कंपनीला समांतर परवाना देऊ नये, महावितरण, पारेषण व महानिर्मिती कंपन्यातील खासगीकरण धोरण बंद करावे, कंत्राटी, आऊटसोर्सिंग व सुरक्षा रक्षक कामगारांना कायम करावे, तिन्ही कंपन्यातील रिक्त जागा त्वरित भराव्यात, महावितरणमधील 2019 नंतरचे उपकेंद्र कंपनी मार्फत चालवा आदी प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

  यापूर्वी राज्यभर निवेदन व मोर्चे काढूनही राज्य शासनाने अद्याप याबाबत निर्णय न घेतल्याने आज रात्री 12 वाजलेपासून 72 तासाच्या संपावर जाण्याचा महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समितीने निर्णय घेतला आहे. तसेच शासनाने मागण्या मान्य न केल्यास 18 जानेवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

अल्पवाढीत देखील सातारा तालुका हॉटस्पॉट

Patil_p

कोरोना काळातही बेळगावसाठी अट्टापीट्टा सुरूच

Patil_p

शिवजयंती उत्साहात साजरी करणार

Amit Kulkarni

मजगाव, स्टेशनरोड येथे मटका अड्डय़ांवर छापे

Tousif Mujawar

बेळगाव-सूरत हवाईप्रवास नोव्हेंबरपासून

Patil_p

कृष्णा खोरेने अतिक्रमणावर फिरवला बुलडोझर

datta jadhav