Tarun Bharat

आज हरतालिका, पाच पाल्यांची भाजी अन् पायस, वरण भात.

घरांमध्ये आज पुजल्या जाणार महादेव व गौरी. देवतांच्या आवडीच्या पदार्थांचा बेत.

रविराज च्यारी /डिचोली

गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येणारा हरतालिका व्रत आज सर्वत्र पाळला जणार आहे. घरामध्ये महादेव व गौरीचे पूजन केले जाणार असून त्यांच्या आवडीच्या पदर्थांचा बेत आखला जाणार आहे. हरतालिका पाळण्यात येणाऱया घरांमध्ये आज महादेवासाठी पायस, वरण – भात तर गौरीसाठी पाच पाल्यांची भाजी, पातोळय़ा व मुगाचे कण्ण अशी पक्वान्न? नैवेद्य म्हणून स्वयंपाकघरात तयार होणार आहेत. त्यासाठी गोवेकर सज्ज झालेले आहेत.

हरतालिका व्रत सर्वांच्याच घरांमध्ये पाळले जात नाही. किंवा पूजले जात नाही. काहीच लोकांच्या घरांमध्ये हरतालिका व्रत पाळले जातात. यादिवशी महादेव पार्वतीचे पूजन केले जाते. त्यांना नैवेद्य दाखवून आरत्या केल्या जातात आणि भोजन केले जाते. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी बहुतेक वेळा हरतालिका येत असते. कधी कधी गणेश चतुर्थीच्या दिवशीच हरतालिका व्रत आल्यास घरातील महिला वर्गाची त्रेधातिरपीट उडते. कारण तीनही देवतांना एकाच वेळी आवडते पक्वान्न तयार करण्याचे आव्हान महिलांना पेलावे लागते.

या व्रताला वेगळेच महत्त्व आहे. या दिवशी घरातील सुवासिनी महिलांना उपवास पाळावा लागतो. महादेवाला आवडीचा असलेला वरण भात व पायस केला जातो. तर गौरीसाठी खास पाच पाल्यांची भाजी, पातोळय़ा, मुगाचे कण्ण अशी पक्वान्न? तयार केली जातात.

या व्रतासाठी लागणारी पाच पाल्यांची भाजी बाजारात गावठी भाजी विक्री करणाऱया महिला आवर्जून विक्रीसाठी आणत असतात. हि भाजी इतर परप्रांतीय भाजी विपेत्यांकडे कधीही सापडणार नाही. त्यात ताकळा, शेगांचा पाला, हळसांद्याचा पाला, चुरणाचा पाला, कुड्ड?ची भाजी, तांबडी भाजी अशा पावसात उगविणाऱया भाज्यांचा समावेश असतो. या पाच पाल्यांच्या भाजीच्या जुडय़ा बांधून ती विक्रीला ठेवली जाते. त्यांचे दर जरी चढे असले तरी या हरतालिका व्रतासाठी ती आवश्यक असल्याने भाविक खरेदीही करतात. अनेकदा सकाळीच हि भाजी बाजारातून गायब झालेली दिसते.

आज हरतालिका व्रत असल्याने ज्या घरांमध्ये हा व्रत पाळला जातो आणि महादेव पार्वतीचे पूजन केले जाते. त्या घरांमध्ये हमखास पाच पाल्यांची भाजी व इतर पदार्थ पहायला आणि आस्वादही घ्यायला मिळणार.

Related Stories

तुये इलेक्ट्रॉनिक सिटी दोन वर्षांच्या आत कार्यरत

Amit Kulkarni

दिल्ली ते गोवा रेल्वेसेवेला संकल्प आमोणकर यांचा विरोध, बॉक्साईट खनिज वाहतुक रोखण्याचीही मागणी

Omkar B

फोंडय़ातील प्रमुख मंदिरात नवरात्रोत्सव मर्यादित स्वरुपात

Omkar B

कुंडई अपघातातील यतीन वारंग यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिमसंस्कार

Omkar B

गोवा आरोग्य सेवेचे सशस्त्रदलाकडून अभिनंदन

Omkar B

कोरोनाचा फैलाव पुन्हा सुसाट

Amit Kulkarni