Tarun Bharat

आज होणार फैसला

मनपावर भगवाच फडकणार, मतदारांचा विश्वास,12 वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगावकरांची शान असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी नुकतेच मतदान झाले आहे. बेळगावचे नगरसेवक कोण? याबाबतचा फैसला आज सोमवारी होणार आहे. आजवर महापालिकेवर मराठी भाषिकांची सत्ता होती. ही सत्ता कायम राखण्यासाठी मतदारांनी कौल दिला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून प्रशासकीय राजवट असलेल्या महापालिकेच्या सत्तेची चावी कुणाच्या हाती जाणार? हे आज स्पष्ट होणार आहे.

महापालिकेच्या 58 वॉर्डांसाठी शुक्रवारी मतदान झाले असून 385 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद आहे. निवडणुकीचा निकाल सोमवार दि. 6 रोजी लागणार असून सकाळी 8 पासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. बी. के. मॉडेल शाळेत ही मतमोजणी होणार असून याठिकाणी प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. 1985 पासून आतापर्यंत महापालिकेवर मराठी भाषिकांचे वर्चस्व कायम आहे. यंदा प्रथमच महापालिका निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांकडून चिन्हावर निवडणूक लढविण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेवर सत्ता कुणाची राहणार? याची चिंता सर्वांना लागून आहे. मात्र आजवर महापालिकेवर मराठी भाषिकांचीच सत्ता होती. यापुढे देखील मराठी भाषिकांचेच वर्चस्व राहणार, असा ठाम विश्वास जनता व्यक्त करीत आहे.

अलीकडेच लोकसभेच्या एका जागेकरिता पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेस, भाजपासह म. ए. समितीने देखील उमेदवार दिला होता. या निवडणुकीत म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी लाखावर मतदानाचा टप्पा गाठला होता. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत म. ए. समितीच्या उमेदवाराला झालेले विक्रमी मतदान पाहून राष्ट्रीय पक्षाच्या नेतेमंडळींना धडकी भरली होती. त्यामुळेच बेळगाव महापालिकेवरील सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराच्या सत्तेची चावी कुणाच्या हाती जाणार? याकडे संपूर्ण शहरासह सीमाभागाचे लक्ष लागले आहे.

 म. ए. समितीच्यावतीने 27 अधिकृत उमेदवार तर उर्वरित वॉर्ड खुले ठेवण्यात आले आहेत. 42 हून अधिक वॉर्डांमध्ये म. ए. समितीचे कार्यकर्ते निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे महापालिकेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने मतदान करण्यात आले आहे. त्यामुळे 35 हून अधिक मराठी भाषिक उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पण मतमोजणीनंतरच हे चित्र स्पष्ट होणार आहे. सोमवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार असून 12 वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

Related Stories

हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत गडकोट मोहीम

Amit Kulkarni

स्मार्ट बसथांब्यांवरील ई-टॉयलेट हस्तांतराविना

Amit Kulkarni

सन्नहोसूर-तोपिनकट्टी रस्ता वर्षभरातच उद्ध्वस्त

Amit Kulkarni

अनमोड घाटात वाहन दरीत कोसळले

Amit Kulkarni

ग्रामीण भागातील बससेवा सुरळीत करा

Amit Kulkarni

अतिपावसाचा भाजीपाला पिकाला फटका

Patil_p