Tarun Bharat

आझम खान यांना मोठा झटका

Advertisements

जौहर विद्यापीठाची 70 हेक्टर जमीन सरकारजमा

वृत्तसंस्था / रामपूर

जौहर विद्यापीठ प्रकरणी उत्तरप्रदेशचे माजी मंत्री आणि समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांना शनिवारी न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. न्यायालयाने जौहर ट्रस्टची 70.05 हेक्टर जमीन उत्तरप्रदेश सरकारच्या नावावर करण्याचा आदेश दिला आहे. ही जमीन आतापर्यंत आझम खान यांच्या जौहर ट्रस्टच्या नावावर होती.

जौहर विद्यापीठाने नियमांचा भंग करत सुमारे 70 हेक्टरपेक्षा अधिक जमीन खरेदी केली होती. प्रत्यक्षात विद्यापीठाला केवळ 12.5 एकर जमीन खरेदी करण्याची अनुमती होती. न्यायालयाने जौहर ट्रस्टला नियमांचे पालन न करण्याप्रकरणी दोषी ठरवत हा निर्णय दिला आहे. तालुक्यातील अभिलेखांमध्ये ही जमीन आता राज्य सरकारच्या नावावर होणार असल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे.

रामपूरचे खासदार आझम यांनी समाजवादी पक्षाचे सरकार असताना ही जमीन जौहर ट्रस्टच्या नावावर केली होती. अनुमतीच्या अनेक अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. प्रशासनाकडून याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. समाजवादी पक्षाच्या शासनकाळात जौहर ट्रस्टला जमीन देताना याचा वापर केवळ धर्मादाय कार्यासाठी करण्याची अट ठेवून मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले होते.

चौकशी अहवालानुसार जौहर ट्रस्टच्या या जमिनीवर विद्यापीठाचे काम सुरू आहे. परंतु मागील 10 वर्षांमध्ये धर्मादायाचे कुठलेच कार्य झाले नसल्याचे उघड झाले आहे. ट्रस्टला एका मर्यादेच्या अंतर्गत जमीन वितरित केली जाऊ शकते, परंतु याप्रकरणी नियम-कायद्यांचे उल्लंघन करण्यात आल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.

Related Stories

गांधी कुटुंबियांसह 25 नेत्यांना नोटीस

Patil_p

माजी राष्ट्रपती कोविंद यांच्या घराला 1.80 कोटी

Patil_p

भारतात मागील 24 तासात 37,148 नवे कोरोना रुग्ण, 587 मृत्यू

datta jadhav

बेंगळुरात पंचमसाली समाजाचा एल्गार

Patil_p

आंध्र, तेलंगणातील निवडणूक लांबणीवर

Amit Kulkarni

पीएम केअर फंडाविरोधातील याचिकाकर्त्यांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

datta jadhav
error: Content is protected !!