Tarun Bharat

आझादनगर गणेशोत्सव सर्वधर्मसमभावाचे प्रतीक

झोपडपट्टीचा भाग, सर्वधर्मिय एकत्र येऊन साजरा करतात उत्सव

प्रसाद नागवेकर / मडगाव

आझादनगर, मडगाव येथील प्रभाग 16 मध्ये आयोजित करण्यात येणाऱया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सर्वधर्मसमभावाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत असतो. सदर मंडळाचे अध्यक्ष सिकंदर अल्लाबकाश खान हे मुस्लिम धर्मातील असून त्यावरून याची प्रचिती येते.

मागील कित्येक वर्षांपासून या ठिकाणी भक्तिभावाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. आझादनगर हा झोपडपट्टीचा भाग असून या ठिकाणी विविध धर्मांतील लोक वास्तव्य करून आहेत. विविध धर्मिय येथे एकत्रितपणे मागील कित्येक वर्षांपासून भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करत आले असल्याचे अध्यक्ष खान यांनी सांगितले.

1992 मध्ये स्थापना

मंडळाचे अध्यक्ष खान हे मुस्लिम असले, तरी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ते हिरिरीने वावरत असतात. धर्म वेगवेगळे असले, तरी देव हा शेवटी एकच असतो, असे त्यांनी सांगितले. 1992 मध्ये आपले वडील तसेच अन्य काहींनी पुढाकार घेऊन येथे आम्ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन केले आणि तेव्हापासून गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. मागील 8 वर्षे आपण या ठिकाणी अध्यक्ष म्हणून कार्यरत असून या मंडळात हिंदू, मुस्लिम तसेच ख्रिस्ती या सर्वांचा समावेश असल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले.

पाच दिवस गणपतीची पूजाअर्चा तसेच आरत्या, नैवेद्य, प्रसाद आदी धार्मिक विधी करून हा गणेशोत्सव साजरा करण्यात येत असतो. याखेरीज सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिण्यात येत असत, असे खान यांनी सांगितले. मात्र मागील वर्षापासून कोविडमुळे सांस्कृतिक कार्यक्रम करणे शक्मय न झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

Related Stories

मृत वाघांवर विषप्रयोग झाल्याचे उघडकीस

Patil_p

आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात लेखी पत्र पंचायत सल्लामसलत करणार– गुळेली पंचायत

Patil_p

नावेली अपघातात 1 ठार, चालकाला अटक

Omkar B

काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीवर शिक्कामोर्तब

Amit Kulkarni

विजसाठी केजरीवाल मॉडल सर्वांत उत्तम

Patil_p

बुधवारी कोरोनाचे 17 बळी

Amit Kulkarni