Tarun Bharat

आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी बाजार तेजीत

सेन्सेक्समध्ये 295 अंकांची वाढ , टेक महिंदा नफ्यामध्ये

वृत्तसंस्था/ मुंबई

आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी भारतीय शेअरबाजार काहीशा मजबुतीसह बंद होण्यामध्ये यशस्वी झाला आहे. बाजारामध्ये आज आरबीएल बँकेच्या समभागामध्ये मोठय़ा प्रमाणात घसरण दिसली. दुसरीकडे टेक महिंद्राचे समभाग मात्र तेजीमध्ये दिसून आले.

सोमवारी सरतेशेवटी शेअरबाजाराचा व्यवहार थांबला तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक 295 अंकांच्या वाढीसह 57,420.24 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 82 अंकांच्या वाढीसह 17,086.25 अंकावर बंद झाला. आरबीएल बँकेचे समभाग 17 टक्के इतके सर्वाधिक घसरणीसह 141 रुपयांवर बंद झाल्याचे पाहायला मिळाले. आरबीएल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक विश्ववीर आहुजा यांना सुटीवर पाठविण्यात आल्याने ठेवीदारांमध्ये चिंता निर्माण झाली होती. या साऱयाचा परिणाम बँकेच्या समभागाच्या भावावरती सोमवारी दिसून आला. जानेवारीमध्ये यावषी या समभागाचा भाव 274 रुपयांवर होता.

आज सकाळी सेन्सेक्स निर्देशांक 176 अंकांच्या घसरणीसह 56,948 अंकांवर खुला झाला होता. सेन्सेक्सने एकावेळी 57,512 अंकांपर्यंत मजल मारली होती. सेन्सेक्समधील 30 पैकी 5 समभाग हे घसरणीसह बंद झाले. घसरणीमध्ये एअरटेल, रिलायन्स, मारुती, इंडसइंड बँक आणि एशियन पेंटस् या कंपन्यांच्या समभागांचा समावेश आहे. दुसरीकडे डॉ. रेड्डीज लॅब्स, पॉवरग्रिड कॉर्प, टेक महिंद्रा, कोटक बँक,
ऍक्सिस बँक आणि सनफार्मा यांचे समभाग तेजीसह बंद झाले. लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 261 लाख कोटी रुपये इतके होते. निफ्टी निर्देशांक सकाळी 16,937 अंकांवर खुला झाला. दिवसभरात या निर्देशांकाने 17,112 अंकांचा सर्वोच्चस्तरही गाठला होता. निफ्टी निर्देशांकामधील 10 समभाग घसरणीसह बंद झाले. सिप्ला, टेक महिंद्रा, कोटक बँक यांचे समभाग तेजीत तर  ब्रिटानियाचे समभाग घसरणीत होते.

Related Stories

मारुतीची कार विकत घेणे अधिक सोपे

Patil_p

उद्योजक मुकेश अंबानींची संपत्ती 92 अब्ज डॉलर्सवर

Patil_p

बायजू नवी 500 केंद्रे 200 शहरांमध्ये स्थापन करणार

Patil_p

विक्रीच्या दबावात सेन्सेक्स घसरणीत

Patil_p

सनटेकच्या प्रकल्पांना तिमाहीत दमदार प्रतिसाद

Patil_p

केंद्राकडून साखर निर्यातीवर बंदी

datta jadhav