Tarun Bharat

आठवडय़ाभरात 6 हजार जणांवर दंडात्मक कारवाई

कोविड केअर सेंटरमधून 600 जणांवर उपचार : 632 बेड शिल्लक असल्याचा दावा

प्रतिनिधी / बेळगाव

गेल्या आठवडय़ाभरात जिल्हय़ात विनामास्क फिरणाऱया 6 हजारहून अधिक जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याजवळून 7 लाख 56 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी शुक्रवारी रात्री एका पत्रकाद्वारे या संबंधीची माहिती दिली आहे.

जिल्हय़ातील सर्व तालुक्मयांमध्ये 24 कोविड केअर सेंटर सुरू केली आहेत. त्यामध्ये 1 हजार 233 बेड्स उपलब्ध आहेत. सध्या या कोविड केअर सेंटरमधून 601 बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत तर 632 बेड उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

आतापर्यंत 36 हजार 332 विनामास्क व सामाजिक अंतर न पाळणाऱयांवर कारवाई करून 45 लाख 29 हजार 250 रुपये दंड आकारण्यात आला आहे. कर्नाटका ऍपीडॅमीक डिसीज ऍक्टनुसार 117 प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. ऑक्सिजन व रेमडेसिवीर संबंधी एक प्रकरण नोंद करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

17 मार्चपासून 27 मे पर्यंतचा अहवाल जिल्हाधिकाऱयांनी जारी केला असून या काळात 2 लाख 28 हजार 700 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 34 हजार 381 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 16 हजार 180 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 17 हजार 904 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

14 हजार 776 जण घरीच उपचार घेत आहेत. तर या काळात 170 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दहा दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी 21.72 इतकी आहे. तर बरे होणाऱयांची टक्केवारी 70.03 टक्के इतकी आहे. मृत्यूचे प्रमाण 0.87 टक्के असल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली आहे.

1 एप्रिल ते 27 मे पर्यंत 11 हजार 262 रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा झाला आहे. सरकारी इस्पितळांसाठी 11 हजार 262 वॉईल इतका साठा आला आहे. सरकारी इस्पितळांना 7 हजार 986 वॉईल पुरविण्यात आले असून गोदामात 3 हजार 276 वॉईल शिल्लक आहेत. याच काळात खासगी इस्पितळांसाठी 19 हजार 368 रेमडेसिवीरचा पुरवठा झाला आहे.

जिल्हय़ात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत…

जिल्हय़ात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा जिल्हाधिकाऱयांनी पत्रकात केला असून 4 लाख 29 हजार 619 जण कोरोनावरील दुसरी लस घ्यायच्या यादीत आहेत. 1 लाख 38 हजार 728 जणांनी लस घेतली आहे, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

शुक्रवारी विनामास्क 394 जणांवर कारवाई

लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरूच ठेवला आहे. शुक्रवारी 394 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून 57 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच तीन दुकानदारांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली आहे. एपीएमसी पोलिसांनी वैभवनगर येथे चिकन दुकान चालविणाऱया इमामहुसेन शेख या दुकानदाराविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे तर बसव कॉलनी येथील श्रीकांत तुप्पद या किराणा दुकानदारावरही एफआयआर दाखल केला आहे.

मारिहाळ पोलिसांनी मोदगा येथील मारुती मराठे या किराणा दुकानदाराविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. शुक्रवारी अनावश्यकपणे रस्त्यावरून फिरणारी 57 वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये मोटारसायकली, कार, ऑटोरिक्षा यांचा समावेश आहे. कोरोना महामारी थोपविण्यासाठी व नागरिकांच्या हितासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. प्रत्येकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी केले आहे.

तहसीलदारांनाही दंड…

शुक्रवारी सकाळी चन्नम्मा चौक परिसरात वाहनांची तपासणी करत असताना याचवेळी तहसीलदार आर. के. कुलकर्णी आपल्या शासकीय वाहनातून या परिसरात आले. त्यांनी मास्क परिधान केला नव्हता. म्हणून पोलिसांनी त्यांना दंड घातल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

अधिवेशन तयारीबाबत जिल्हाधिकाऱयांनी घेतली अधिकाऱयांची बैठक

Amit Kulkarni

शरीर सुदृढ राहण्यासाठी जिम्स्ना परवानगी द्या

Patil_p

बँक रक्कम वाहतूक करण्यासाठी ‘कीम अॅप’ सुरू

Amit Kulkarni

कोरोनाची लागण झालेल्या 343 वकिलांना आर्थिक साहाय्य

Amit Kulkarni

गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी आजपासून महालिलाव

Patil_p

सीमालढा आणखी तीव्र करण्याची गरज

Amit Kulkarni
error: Content is protected !!