Tarun Bharat

आठवडय़ाला 174 विमानफेऱयांना मिळाली परवानगी

प्रतिनिधी / बेळगाव

दिल्ली येथील नागरी उड्डाण मंत्रालयाच्यावतीने देशभरात आठवडय़ाला 12 हजार 983 देशांतर्गत विमानफेऱयांना मंजुरी दिली आहे. बेळगाव विमानतळावरून आठवडय़ाला 174 फेऱयांना मंजुरी देण्यात आली आहे. 25 ऑक्टोबर ते पुढील वर्षाच्या मार्च 27 पर्यंत जाहीर करण्यात आलेल्या हिवाळी हंगामासाठी या फेऱया वाढविण्यात आल्या आहेत.

बेळगाव विमानतळावरून 5 विमान कंपन्यांना 30 फेऱयांची मंजुरी देण्यात आली आहे. आठवडय़ाला 174 विमानांचे टेकऑफ व लँडिंगला परवानगी देण्यात आली आहे. हिवाळा हंगामात बेळगावमधून नव्या कोणत्याही मार्गाला परवानगी देण्यात आलेली नसली तरी उन्हाळा हंगामात विमानांच्या फेऱया वाढण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.

इंडिगो ही विमान कंपनी बेंगळूर व हैदराबाद या मार्गावर दैनंदिन सेवा देते. त्यांच्या आठवडय़ाला एकूण 28 फेऱया होतात. स्पाईस जेट कंपनीच्या बेंगळूर, मुंबई व हैदराबाद या शहरांना 42 फेऱया होतात. ट्रू जेट कंपनीच्या हैदराबाद, म्हैसूर, कडप्पा व तिरुपती या शहरांना 50 फेऱया होतात. अलायन्स एअर या कंपनीच्या बेंगळूर, पुणे या शहरांना 28 फेऱया होतात. स्टार एअर या कंपनीच्या अहमदाबाद, इंदूर, मुंबई, बेंगळूर या शहरांना 26 फेऱया होतात. 

Related Stories

मतदान केंद्रांची चाचपणी करण्याची सूचना

Patil_p

ग्रा. पं. निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्धार

Omkar B

जुन्या भाजीमार्केटजवळ मटकाबुकीला अटक

Patil_p

सेंट पॉल्स पीयूच्या ऊर्जा महोत्सवाचे उद्घाटन

Omkar B

निवडणुकीच्या धांदलीत घरोघरी पोहोचतंय मटण!

Patil_p

बागलकोटमध्ये दोन, विजापूरमध्ये तिघांना लागण

Patil_p