Tarun Bharat

आठ महिन्याच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या

प्रतिनिधी/ कराड

अवघ्या आठ महिन्याच्या चिमुकल्यास पोटाला बांधून 23 वर्षीय महिलेने विहिरीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना कासारशिरंबे (ता. कराड) येथे घडली. गावातील पालकराचा मळा नावाच्या शिवारातील विहिरीत मायलेकरांचे मृतदेह आढळल्याने परिसर सुन्न झाला. राजश्री शंकर रासकर (वय 23) मुलगा शिवतेज (वय 8, दोघे रा. कडेगाव, जि. सांगली) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कासारशिरंबे येथील वनिता दगडे व त्यांचे पती बबन दगडे हे दोघे मंगळवारी सकाळी सात वाजता पालकराचा मळा शिवारात जनावरांना चारा आणण्यासाठी निघाले होते. जाताना संतोष दत्तात्रय पाटील यांच्या विहिरीकडेच्या पाऊलवाटेने जाताना त्यांना तेथे लहान मुलाची दुधाची बाटली व दुपटे दिसून आले. त्यामुळे त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले. त्यावेळी विहिरीत त्यांना महिलेचा मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील व ग्रामस्थ घटनास्थळी आले. मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यावेळी मृत महिलेने स्टोलच्या सहाय्याने स्वतःच्या मुलास पोटाला बांधल्याचे व या घटनेत मुलाचाही मृत्यू झाला असल्याचे समोर आले. मृत महिला ही बहिणीची मुलगी राजश्री शंकर रासकर (वय 23) व तिचा आठ महिन्याचा मुलगा शिवतेज असल्याचे वनिता दगडे यांनी ओळखले.

घटनेची माहिती मिळताच कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, उपनिरीक्षक राजू डांगे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. दुपारी पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतांच्या नातेवाईकांसोबत चर्चा केली.

 मृत राजश्री रासकर हिचे माहेर वाळवा तालुक्यातील नेर्ले असून सासर कडेगाव (जि. सांगली) आहे. तिचे मावशीच्या गावी कासारशिरंबे येथे प्राथमिक शिक्षण झाले होते. दोन वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. ती दवाखान्यात जाते, असे सांगून सोमवारी सकाळी कडेगाव येथून निघून आली होती. मात्र दवाखान्यात न जाता ती सायंकाळी कासारशिरंबे येथे पोहोचली. तिने मावशीकडेही न जाता आठ महिन्याचा मुलगा शिवतेज याला स्वतःच्या पोटाला बांधून विहिरीत उडी घेतली, त्यामध्ये तिचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Related Stories

हद्दवाढ क्षेत्रातील बांधकाम परवान्यात अडचण

datta jadhav

सातारा : शाहूपुरीतील ओढा गायब

datta jadhav

सज्जनगडावर भगवा ध्वज फडकावून नव्या वर्षाचे स्वागत

datta jadhav

चिंताजनक : राज्यात गेल्या ४८ तासांत २७८ पोलीस कोरोना ‘पॉझिटीव्ह’

Archana Banage

झेडपीच्या सभेत होणार गोंधळ

datta jadhav

नामांतराच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवार म्हणाले…

Tousif Mujawar
error: Content is protected !!