Tarun Bharat

आठ राज्यांना मिळणार नवे राज्यपाल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आठ राज्यांच्या राज्यपालांची नव्याने नियुक्ती केली आहे. 

राजस्थानमधील दलित नेते आणि केंद्रातील सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हरी बाबू कामभापती यांची मिझोरामच्या राज्यपालपदी तर मंगुभाई छगनभाई पटेल यांची मध्यप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राजेंद्रन विश्वनाथ अरलेकर यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी, मिझोरामचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांची गोव्याच्या  राज्यपालपदी, हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची त्रिपुराच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस यांना झारखंडचे राज्यपाल बनविण्यात आले आहे. याशिवाय बंडारू दत्तात्रेय यांची हरियाणाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Stories

सोनिया गांधींनी बोलावली आज विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक ; मुख्यमंत्री ठाकरे राहणार उपस्थित

Archana Banage

अनिल परबानंतर सोमय्यांचा ठाकरे परिवाराकडे मोर्चा, दिला थेट इशारा

Archana Banage

काश्मीरच्या दौऱयावर जाणार अमित शाह

Patil_p

‘रडने का नही, भिडने का’; चित्रा वाघ यांनी घेतली तहसीलदार ज्योती देवरेंची भेट

Archana Banage

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ

Patil_p

लसीविषयी अफवा पसरविल्यास कारवाई

Patil_p