Tarun Bharat

आठ लाखाच्या अपहारप्रकरणी ग्रामसेवकासह सरपंचावर गुन्हा

प्रतिनिधी/ खेड

तालुक्यातील अस्तान ग्रामपंचायतीत 14 व्या वित्त आयोग व ग्राम निधीतून प्राप्त झालेली 8 लाखांची रक्कम परस्पर काढून अपहार केल्याप्रकरणी ग्रामसेवकासह सरपंचावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 ग्रामसेवक शशिकांत शंकर जाधव (53, वीर-चिपळूण), सरपंच दीपक जगन्नाथ मोरे (सणघर-खेड) अशी दोघांची नावे आहेत. ही घटना 2017 ते 2020 या कालावधीत घडल्याचे ग्रामविस्तार शरद भांड यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

ग्रामविस्तार अधिकारी शरद भांड यांच्या अखत्यारित येणाऱया अस्तान ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणीचे काम सुरू होते. 2017 ते 2020 या कालावधीत ग्रामपंचायतीत 14व्या वित्त आयोग व ग्राम निधीतून प्राप्त झालेल्या 8 लाख 24 हजार 750 रूपयांचा निधी गावच्या विकासासाठी खर्च न करता दोघांनी संगनमताने परस्पर काढून शासकीय रक्कमेचा अपहार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार दोघांवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हिंगे करत आहेत.

Related Stories

जिह्यात बळीराजाला पावसाची प्रतीक्षा

Patil_p

अन्यायकारक शासन निर्णयाची संगणक परिचालकांकडून होळी

Patil_p

रत्नागिरीत बालरोगतज्ञांच्या टास्क फोर्ससह कोविड रूग्णालय सज्ज!

Patil_p

मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी ३ तास बंद, काजळी नदीचा रुद्रावतार

Archana Banage

संगमेश्वर बाजारपेठेत कोकणी मेव्याची एन्ट्री

Patil_p

शिव बुद्रूक प्राथमिक आरोग्य केंद्र अडकलेय गैरसोयींच्या गर्तेत!

Patil_p