Tarun Bharat

आठ वर्षांनंतर होणार चतुर्थ वार्षिक पाहणी

सातारा / प्रतिनिधी :

सातारा शहरात दरवर्षी सुमारे 100 नव्या मिळकतींची भर पडत आहे. या नव्या मिळकतींची नोंदणी चतुर्थ वार्षिक पाहणी पत्रानुसार करपात्र अद्याप गेल्या आठ वर्षात पालिकेच्या वसुली विभागाकडे नोंद झालेल्या नाहीत. त्यामुळे पालिकेला कोट्यवधी रुपयांचा महसुल बुडाला आहे. सोमवारीपासून या चुतर्थ वार्षिक पाहणीच्या कामाला सुरुवात होणार होती. परंतु वसुली अधीक्षक अन्य कामानिमित्ताबाहेर गेल्याने नियुक्तीच्या ऑर्डरी टायपिंग केलेल्या सहीवाचून तशाच पडून राहिल्या आहेत. येऊ घातलेल्या निवडणूकांमुळे हे काम पूर्ण होणार काय? असाही प्रश्न उपस्थित रहात आहे.

सातारा शहराची चुतर्थ वार्षिक पाहणी 2014 मध्ये झाली होती. 2015 ते 2019, 2020 ते 2024 अशा कालावधीचे पाहणीपत्रक झाले नाही. त्यामुळे शहरात दरवर्षी सुमारे 100 मिळकतींची भर पडत आहे. त्या मिकळतींकडून अद्याप पालिकेकडे कसलाही कर भरणा झालेला नसल्याने कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. पाहणी पत्रकच झाले नसल्याने कर मागणीच्या नोटीस त्या नव्या मिळकतधारकांना गेल्या नाहीत. त्यामुळे या नव्या मिळकतींची नोंदणी चतुर्थ वार्षिक पाहणी पत्रानुसार करण्यात येणार आहे.

Related Stories

महत्वाची बातमी! यंदा दहावी,बारावी निकाल २० जूनच्या आधी

Rahul Gadkar

बेकायदा बैलगाडा शर्यत प्रकरणी 5 जणांवर गुन्हा

datta jadhav

कोयना पाणलोटमध्ये पावसाचा जोर वाढला

Patil_p

ऑक्सिजनच्या ऑडिटसाठी तपासणी पथकांची नियुक्ती

datta jadhav

पुण्यातील खाजगी सावकार महिलेच्या तावडीतून सुटका करा

Patil_p

प्राधिकरणाच्या थकीत बिलावरील विलंब आकार झाला माफ

Patil_p