Tarun Bharat

आडत व्यापारी करणार आजपासून विक्री बंद

Advertisements

असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय:प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

प्रतिनिधी/ सातारा

प्रशासनाने आडत व्यापाऱयांसह शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे हाल चालवले आहेत. आडत व्यापाऱयांचे केंद्र बंद केले आहे. त्यामुळे आडत व्यापाऱयांकडून किरकोळ विक्रेत्यांना भाजीपाला देता येत नाही, त्यामुळे सगळे नियोजन नियोजन कोलमडले आहे. प्रशासनाच्या या भूमिकेच्या निषेधार्थ सोमवारपासून शहरात आडत व्यापारी कोणताही व्यवहार करणार नाहीत, असा निर्णय सातारा आडत असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे शहरात किरकोळ घरपोहच विक्री करणाऱया भाजी विक्री करणाऱया भाजी विक्रेत्यांना भाजीपाला मिळणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 रविवार पेठेत मार्केट कमिटीच्या आडत असोसिएशनच्या कार्यलयात ही बैठक पार पडली. बैठकीला आडत असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण कांबळे, उपाध्यक्ष फारुख बागवान, खजिनदार महंमदअली बागवान, सचिव विजय केंडे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. या बैठकीत प्रशासनाने कशा पद्धतीने आडत व्यापाऱयांचे हाल केले आहेत. त्यावर चर्चा झाली. आडत व्यापाऱयांना अगोदर भाजी मंडईच्याबाहेर व्यवस्था करून दिली होती. त्यानंतर शाहू क्रीडा संकुलात जागा दिली होती. मात्र, पुन्हा आडत व्यापाऱयांचे केंद्रच बंद केले. कोरोनावर प्रादुर्भावाच्या अनुषंगाने गेले पन्नास दिवस लॉकडाऊनमध्ये सर्व आडत व्यापऱयांनी वेळोवेळी जागा बदल केल्यामुळे शेतकरी वर्गाला मोठय़ा प्रमाणात त्रास झाला आहे. यामध्ये प्रशासनाला व पोलिसांना आणि मार्केट कमेटी यांना ही त्रास झाला आहे. हे आम्ही जाणून आहोत. म्हणून आम्ही विनंती करतो की, श्री. छ. शाहू मार्केट यार्डमध्ये भुसार मार्केटप्रमाणे होलसेल आडत व्यापार करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

 वास्तविक व्यापारी व्यापार करताना प्रशासनास सहकार्य करू असे म्हणत आहेत. यामध्ये सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर, सॉनीटाझर गोष्टीची अंमलबजावणी करणार आहोत. एक दिवस भाजी मार्केट व एक दिवस कांदा बटाटा व फळे अदलून बदलून तेथे होलसेल व्यापार मार्केट यार्डमध्ये सकाळी 5 ते 9 वेळे मध्ये व्यापार करतील, अशी ही विनंती केली परंतु प्रशासनाने कोणतीही दाद दिली नाही. त्यामुळे सोमवारपासून भाजीपाला आडत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाला असोसिएशनने कळवला आहे. प्रशासन काय भूमिका घेत त्याकडे आता लक्ष असून यामुळे घरपोहच भाजीपाला विक्री करणाऱया विक्रेत्यांना भाजीपाला मिळणार नाही. सातारकर नागरिकांची चांगलीच कोंडी होणार असल्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे.

Related Stories

सांगलीला दिलासा : विजय नगरमधील ‘त्या’ रुग्णाच्या कुटुंबातील चौघे निगेटिव्ह

Abhijeet Shinde

पुणे : खासगी रुग्णालयातील 80 % बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवणार

Rohan_P

सातारा : कायाकल्प पुरस्कारामध्ये रेठरेचा डंका

Abhijeet Shinde

वऱ्हाडाचा ट्रक दरीत कोसळून तिघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

समन्वया अभावी पालिकेची सभा तहकुब

Patil_p

सातारा जिल्हा रुग्णालयातून मृत महिलेच्या अंगावरील दागिने गायब

Abhijeet Shinde
error: Content is protected !!