Tarun Bharat

आणखी एका देशात सत्तांतराचा प्रयत्न

अध्यक्षांच्या हत्येच्या प्रयत्नाचा आरोप – अटकसत्र

वृत्तसंस्था/ पोर्ट एयू प्रिन्स

म्यानमारनंतर आणखीन एका देशात सत्ता उलथविण्याचा प्रयत्न झाला आहे. कॅरेबियन देश हैतीच्या प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासह 23 जणांना अटक केली आहे. या सर्वांवर अध्यक्ष जुवानेल मोइसे यांना पदावरून हटविण्याच्या कटात सामील असल्याचा आरोप आहे.

23 आरोपींमध्ये एक वरिष्ठ पोलीस अधिकारीही सामील आहे. या आरोपींना पैसे, बंदुका आणि दारूगोळय़ासह ताब्यात घेण्यात आल्याचा दावा पंतप्रधना जोसेफ जुटे यांनी केला आहे. आरोपींनी राष्ट्रीय महालाचे सुरक्षा अधिकारी, उच्चपदस्थांशी संपर्क साधला होता. अध्यक्षांना अटक करण्यासह दुसऱया व्यक्तीला अध्यक्षपदी बसविण्याचा कट होता, असे जुटे म्हणाले.

हत्येसह सरकार पाडविण्याचा कथित कट 20 नोव्हेंबरपासून सुरू झाला होता असे विधान अध्यक्ष मोसे यांनी केले आहे. अटकेतील अधिकाऱयांकडून अनेक शस्त्रास्त्रs हस्तगत करण्यात आली आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यविकेल डाबरेजिल यांनी तयार केलेले भाषणही सापडले आहे. हे भाषण सत्तांतर झाल्यावर अंतरिम अध्यक्ष वाचणार होता, असे पंतप्रधान जुटे यांनी सांगितले आहे.

Related Stories

भारतीय मुलीने अमेरिकेत जिंकली स्पर्धा

Patil_p

समुद्रसपाटीपासून हजारो फूट खाली वसलेले गाव

Patil_p

कोरोनाकडे दुर्लक्ष; इटलीच्या पंतप्रधानांची तीन तास चौकशी

datta jadhav

आगीमुळे बुडाली इराणची ‘खर्ग’ युद्धनौका

datta jadhav

व्हॅलेंटाईन गिफ्ट, पतीला धक्का

Patil_p

काबूल बॉम्बस्फोटानंतर राशिद खानची भावूक पोस्ट, म्हणाला…

Archana Banage
error: Content is protected !!