Tarun Bharat

आणखी पाचजणांचा मृत्यू, 73 नवे रूग्ण

Advertisements

प्रतिनिधी /रत्नागिरी :

जिल्हय़ात कोरोनामुळे होणाऱया मृत्यूंच्या संख्येत वाढच होत असून गुरूवार सांयकाळपासूनच्या 24 तासांत रत्नागिरी व चिपळूणातील प्रत्येकी दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय जिल्हय़ाबाहेरील एका व्यक्तीलाही कोरोनामुळे प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोनाबळींची संख्या 112 वर पोहचली आहे. दरम्यान, 24 तासांत 73 नवे रूग्ण आढळल्याने बाधीतांची एकूण संख्या 3110 झाली आहे

   बुधवारी सायंकाळनंतर चिपळूणमधील 75 वर्षीय, रत्नागिरीतील 49 वर्षीय तर जिल्हय़ाबाहेरील असलेल्या 65 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर गुरूवारी आणखी दोघांचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये चिपळूणमधील 84 वर्षीय व्यक्ती तर रत्नागिरीतील 83 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. रत्नागिरी तालुक्यातील आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोनाबळींची संख्या 38 झाली आहे.

   गेल्या 24 तासांत जिल्हयात 73 नवे रूग्ण सापडले आहेत. त्यात आरटीपीसीआर चाचणीमध्ये रत्नागिरीत 22 जणांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये रत्नागिरीत 4, लांजा 9, कामथे 32, संगमेश्वर 2, लोटे 4 असून 51 नवे रूग्ण सापडले आहेत.  

आणखी 36 जण बरे

   गुरूवारी कोरोनावरील यशस्वी औषधोपचारांनतर 36 जण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 1989 झाली आहे. गुरूवारी डिस्चार्ज मिळालेल्यांमध्ये रत्नागिरी समाजकल्याण येथून 2, घरडा 2 व पेढांबे येथील 32 जणांचा समावेश आहे. जिल्हय़ात होम क्वारंटाईन असणाऱयांच्या संख्या 30 हजार 737 आहे.

राजापूरात पोलीस कर्मचाऱयाला लागण       

राजापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गणेशोत्सव काही तासांवर आला असताना राजापूर शहर परिसरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे.  गुरूवारी राजापूर ग्रामीण रूग्णालयातील ऍन्टीजेन टेस्टमध्ये पोलीस कर्मचाऱयाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या 117 झाली आहे. यापैकी 81 जण बरे झाले आहेत. तर 29 जण उपचार घेत आहेत.

Related Stories

रत्नागिरी : पतीने केला पत्नीचा खून; राजापुरातील खळबळजनक घटना

Abhijeet Shinde

मुंबई-विरार येथील स्वयंसेवी संघटना पूरग्रस्तांच्या मदतीला

Ganeshprasad Gogate

‘साहेब पाठीवर मारा, पण पोटावर मारू नका’

Patil_p

‘कसाल’चे नामकरण ‘कारलेवाडी’

NIKHIL_N

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पॉझिटिव्ह

NIKHIL_N

कोळंब पूलप्रश्नी काँग्रेस आक्रमक

NIKHIL_N
error: Content is protected !!