Tarun Bharat

आणखी 80 पॉझिटिव्ह, चौघांचा मृत्यू

Advertisements

82 जणांना डिस्चार्ज, 1 हजार 998 जण कोरोना मुक्त : सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 99

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून मंगळवारी आणखी 80 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून कोरोनामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर बरे झालेल्या 82 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

गेल्या चार-पाच दिवसांत कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण थोडे कमी झाले होते, ते आता वाढू लागले आहे. सोमवारी 48 पॉझिटिव्ह, तर मंगळवारी 80 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना बाधित एकूण रुग्ण संख्या 3 हजार 165 झाली आहे. तसेच बरे झालेल्या आणखी 82 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 1 हजार 998 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आणखी चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कणकवली तालुक्मयातील घोणसरी येथील दीपक कारेकर (वय 35), वेंगुर्ले तालुक्मयातील रेडी येथील जयदेव कृष्णाजी (वय 70), संदीप केरकर (वय 36) आणि कुडाळ केशव भिसे (वय 65) या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 68 जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत. सद्यस्थितीत जिल्हय़ात 1 हजार 99 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

तपासण्यात आलेले एकूण नमुने                                           23205

आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने                                                3165

आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने                                      19455

अहवाल प्राप्त न झालेले नमुने                                              585

सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण                                  1099

मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या                                             68

डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण                                              1998

गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती                8055

नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती               12808

Related Stories

… आता खासदार राऊत काय भुमिका घेणार

Patil_p

‘एक राखी ‘सैनिकांसाठी’- ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम !

Anuja Kudatarkar

मातोंडला सौ. नम्रता परब ठरल्या पैठणीच्या मानकरी

NIKHIL_N

चिंदर भाजपच्यावतीने आचरा विद्युत उपकेंद्रात धडक

Anuja Kudatarkar

नव्या अग्निशमन बंबाने लावली राजकीय आग!

Patil_p

उद्योजक पुष्कराज कोले यांना मातृशोक

NIKHIL_N
error: Content is protected !!