Tarun Bharat

…आणि तो युवा महोत्सव आर्याचा अखेरचा ठरला

अज्ञात वाहनाच्या धडकेत महाविद्यालयीन युवती जागीच ठार

उचगाव / वार्ताहर

कोल्हापूर-हुपरी रस्त्यावर गडमुडशिंगी ता. करवीर येथील महावितरणच्या स्टेशनसमोर शनिवार दि १८ डिसेंबर रोजी रात्री झालेल्या अपघातात आर्या संतोष पोतदार वय १९ , रा. महावीरनगर, हुपरी या महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. युवतीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात घडला. यामुळे तीचा हा युवा महोत्सव आर्याचा अखेरचा ठरला आहे.

याबाबतची माहिती अशी की, हुपरी येथील आर्या ही कोल्हापुरातील एका महाविद्यालयात विज्ञान- बायोटेक्नॉलॉजीच्या पहिल्या वर्षात शिकत होती. आर्याला नेहमी वाहनाने कॉलेजला सोडले जायचे. परंतु आज युवा महोत्सवाचा कार्यक्रम असल्यामुळे ती दुचाकी घेऊन आली होती. सायंकाळी उशिरा ती घरी परतत होती.

साडेसातच्या सुमारास ती कोल्हापूर हुपरी रस्त्यावर गडमुडशिंगी येथील महावितरणच्या स्टेशनसमोर आली असता अज्ञात वाहनाने तिला धडक दिली. या धडकेमध्ये ती स्कूटरवरुन रस्त्यावर पडली. यानंतर घडनास्थळावरुन तिला सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत रात्री उशिरा गांधीनगर पोलीसांमध्ये फिर्याद नोंद करण्याचे काम सुरु होते.

Related Stories

Kolhapur : ‘पर्यटना’तून जिह्याच्या विकासासाठी वाढीव निधीची तरतुद- पालकमंत्री दीपक केसरकर

Abhijeet Khandekar

लॉकडाऊन : कर्मचाऱ्यांना लागली पगाराची ओढ

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना कहर; आज सर्वाधिक नवे रुग्ण, ३९ बळी

Archana Banage

कोरोनाग्रस्त महिलेच्या कुटुंबातील ५ जणांची चाचणी निगेटिव्ह

Archana Banage

माजी नगरसेविका इंदिरा जाधव कसबेकर यांचे निधन

Archana Banage

आजरा तालुक्यातील शिवसेना ‘मातोश्री’सोबत!

Kalyani Amanagi